OnePlus Open 2: लाँचिगपूर्वी OnePlus च्या नवीन स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लिक, वायरलेस चार्जिंग असण्याची शक्यता
टेक कंपनी OnePlus नवीन वर्षात त्यांचा नवीन आणि बहुप्रतिक्षित स्मार्टफोन लाँच करू शकते. हा स्मार्टफोन भारतात आणि जागतिक बाजारपेठेत OnePlus Open 2 या नावाने लाँच केला जाऊ शकतो. या नवीन स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी त्याचे काही स्पेसिफिकेशन्स लिक झाले आहेत. OnePlus Open 2 हा नवीन स्मार्टफोन Oppo Find N5 चा रीब्रँड म्हणून लाँच केला जाऊ शकतो. पण कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तसेच या स्मार्टफोनच्या लाँचिंग डेटबद्दल देखील अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
Year Ender 2024: तुम्ही Google वर यावर्षी कोणत्या शब्दांचे अर्थ शोधले? जाणून घ्या मजेदार उत्तर
OnePlus Open स्मार्टफोन लाँच होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे आणि आता कंपनी या स्मार्टफोनचे अपग्रेड वर्जन लाँच करण्यावर भर देत आहे. लीक्समध्ये असे म्हटले गेले आहे की Oppo Find N5 चे रीब्रँड केले जाईल आणि भारतासह जागतिक बाजारपेठेत हा स्मार्टफोन OnePlus Open 2 म्हणून लाँच केला जाईल. मात्र या संदर्भात कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय लीक्समध्ये नवीन स्मार्टफोनच्या अपेक्षित वैशिष्ट्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
एका लीकनुसार, Oppo Find N5 चाचणीच्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे कंपनीकडून लवकरच या स्मार्टफोनची घोषणा केली जाऊ शकते. OnePlus Open 2 स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. यामुळे फोल्डेबल फोनचा वेग आणि कार्यक्षमता सुधारणार आहे. आणि युजर्सना हा फोन वापरताना एक वेगळा अनुभव येणार आहे. Oppo Find N5 चे रीब्रँड म्हणून लाँच केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंग मिळण्याची शक्यता आहे. वनप्लस ओपनमध्ये हे वैशिष्ट्य नव्हते. नवीन फोनमध्ये वायरलेस चार्जिंग प्रदान करून, कंपनी ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन अधिक आकर्षक बनवत आहे.
यावेळी कंपनी टिकाऊपणावर देखील काम करत आहे आणि नवीन मॉडेल पाण्याच्या प्रतिकारासाठी IPX8 रेटिंगसह लाँच केले शकते. त्यात अँटी फॉल बॉडी स्ट्रक्चर दिले जाऊ शकते असाही अंदाज वर्तवला जात आहे. जेणेकरून फोन हातातून पडला तर तो खराब होऊ नये. नवीन मॉडेल सध्याच्या मॉडेलपेक्षा हलके आणि पातळ असण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे ते हाताळणं सोपं जाऊ शकतं. नवीन मॉडेलमध्ये पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली बॅटरी असण्याची अपेक्षा आहे.
Realme 14x 5G: Realme चा नवा स्मार्टफोन 15 हजारांपेक्षा कमी किमतीत लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन
नवीन मॉडेलच्या कॅमेरा सेटअपमध्येही बदल पाहिले जाऊ शकतात. जर लीकवर विश्वास ठेवायचा असेल तर, या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्ससह ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकतो. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हा फोन चीनमध्ये लाँच केला जाऊ शकतो. यानंतर ते भारतासह इतर बाजारपेठांमध्ये लाँच केले जाईल. मात्र अद्याप कंपनीच्या अधिकृत घोषणेची प्रतिक्षा आहे.