Apple च्या अपकमिंग iPhone पेक्षाही पातळ असेल Samsung चा हा स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स झाले लिक
टेक कंपनी सॅमसंगची नवीन स्मार्टफोन सिरीज Samsung Galaxy S25 जानेवारीमध्ये लाँच केली जाणार आहे. या सिरीजमध्ये लाँच केल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये Samsung Galaxy S25 Slim चा देखील समावेश असू शकतो. या स्मार्टफोनची लाँच डेट अद्याप कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स लिक झाले आहेत. सॅमसंगचा हा स्मार्टफोन iPhone 17 Air पेक्षा देखील पातळ असणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अरे देवा! गुगल मॅपची चुक की विद्यार्थ्यांचा निष्काळजीपणा? काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या
टेक जायंट कंपनी अॅपलचा आगामी फोन iPhone 17 Air देखील 2025 मध्ये लाँच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. लाँचिंगपूर्वीच दोन्ही स्मार्टफोनमध्ये काटे की टक्कर सुरु झाली आहे. कोणता स्मार्टफोन जास्त स्लिम असेल आणि प्रिमियम लूक देईल याबद्दल युजर्स प्रचंड उत्सुक आहेत. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की Samsung Galaxy S25 Slim स्मार्टफोन Apple च्या आगामी फोन iPhone 17 Air पेक्षा पातळ असणार आहे. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, Samsung Galaxy S25 Slim हा बाजारातील सर्वात पातळ फोन असू शकतो. या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स देखील लिक झाले आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
Samsung Galaxy S25 सिरीज लाँच करण्याबाबत सुरु असलेल्या चर्चा वाढल्या आहेत. टीपस्टरने एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, Samsung Galaxy S25 Slim मध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले असू शकतो. जर ही माहिती बरोबर असेल, तर Galaxy S25 Slim चा डिस्प्ले Galaxy S25+ मॉडेलसारखा असू शकतो, जो Galaxy S25 आणि Galaxy S25 Ultra सोबत जानेवारी 2025 मध्ये लाँच केला जाईल अशी अपेक्षा आहे
Galaxy S25 Slim (SM-S937x/DS) :
• 6.66″ display (like S25+)
• 200MP HP5 main camera
• 50MP JN5 UW
• 50MP JN5 3.5X telephoto• SD 8 Elite
• 4700mAh – 5000mAh🔋Launching in Q2, 2025 – similar to A & FE series launch timeline.
— Debayan Roy (Gadgetsdata) (@Gadgetsdata) December 20, 2024
Galaxy S25 Slim हा Qualcomm च्या Snapdragon 8 Elite चिपसेटसह लाँच होण्याची शक्यता आहे, जो ऑक्टोबर 2025 मध्ये लाँच होणार आहे. याव्यतिरिक्त, स्लिम फॉर्म फॅक्टर असूनही, फोनमध्ये 4,700mAh ते 5,000mAh बॅटरी समाविष्ट असू शकते.
स्मार्टफोनचा फोटो लीक करणं पडल महागात; Samsung ने कर्मचाऱ्याच्या बाबतीत घेतला मोठा निर्णय
टीपस्टरने शेअर केलेल्या पोस्टच्या मते, Galaxy S25 Slim मॉडेलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. यात ISOCELL HP5 सेन्सरसह 200-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल. याशिवाय, दोन 50-मेगापिक्सेल कॅमेरे असतील, त्यापैकी एक अल्ट्रावाईड आणि दुसरा टेलीफोटो (3.5x ऑप्टिकल झूम) फोटोग्राफीसाठी असेल. हा कॅमेरा सेटअप iPhone 17 Air पेक्षा वेगळा बनवतो, ज्यामध्ये फक्त एकच मागील कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
चायनीज मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट Weibo वर टिपस्टर Ice Universe नुसार, Galaxy S25 Slim ची जाडी 7mm पेक्षा कमी असू शकते. iPhone 17 Air किंचित जाड असू शकते, जो 2025 च्या उत्तरार्धात लाँच होण्याची अपेक्षा आहे.