अरे देवा! गुगल मॅपची चुक की विद्यार्थ्यांचा निष्काळजीपणा? काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या अरे देवा! गुगल मॅपची चुक की विद्यार्थ्यांचा निष्काळजीपणा? काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या
लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप गुगल मॅप गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांत गुगल मॅपमुळे अनेक घटना घडल्या आहे. यामध्ये कोणचा मृत्यू झाला तर कोणी जखमी झालं आहे. एका घटनेत तर गुगल मॅपमुळे एक कुटूंब जंगलात पोहोचलं होतं. या सर्व घटनानंतर आता आणखी एक घटना समोर आली आहे.
स्मार्टफोनचा फोटो लीक करणं पडल महागात; Samsung ने कर्मचाऱ्याच्या बाबतीत घेतला मोठा निर्णय
एका घटनेत गुगल मॅपचा वापर करत विद्यार्थानी चुकीच्या परीक्षा केंद्रावर पोहोचली तर दुसऱ्या घटनेत दोन विद्यार्थी कॉलेजच्या बंद असलेल्या गेटजवळ पोहोचलो. यामुळे या तिन्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्य परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि तिन्ही विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. मात्र या घटनांमध्ये केवळ गुगल मॅपची चुकी आहे की विद्यार्थ्यांचा निष्काळजीपणा देखील यासाठी कारणीभूत ठरला आहे, याबाबत आता चर्चा सुरु आहे. परीक्षा बुडण्याचे कारण विद्यार्थ्यांचा निष्काळजीपणा आहे की गुगल मॅपवर दाखवण्यात आलेला रस्ता, याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणांबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
गुगल मॅपने दाखविलेल्या मार्गाने जात असताना इस्लामिया इंटर कॉलेजमध्ये पोहोचलेल्या दोन उमेदवारांना UPPS प्राथमिक परीक्षेसाठी उशिरा झाला आणि त्यांना प्रवेश मिळू शकला नाही. इस्लामिया इंटर कॉलेजच्या मुख्य गेटचे ठिकाण गुगल मॅपमध्ये दाखवण्यात आले होते, मात्र प्रशासनाने हा गेट बंद ठेवला होता. जेव्हा दोन्ही उमेदवार मुख्य गेटवर पोहोचले तेव्हा गेट बंद होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या गेटकडे जावे लागले. दुसऱ्या गेटवर पोहोचायला थोडा वेळ लागला आणि परीक्षेच्या वेळेसाठी त्यांना तीन मिनिटे उशीर झाला. यानंतर कॉलेज प्रशासनाने त्यांना परीक्षेला बसू दिले नाही.
काय सांगता! दरमहिना फक्त 299 रूपये देऊन घरी आणा ‘हा’ ब्रँड न्यू स्मार्टफोन; काय आहे Flipkart ची ऑफर?
दुसऱ्या घटनेत सारख्या नावाच्या कॉलेजमुळे गुगल मॅप आणि विद्यार्थीनी दोघांचा गोंधळ उडाला. हातरस शहरात बागला नावाचे इंटर आणि डिग्री महाविद्यालय आहे. विद्यार्थीनीला परिक्षेसाठी बागला इंटर कॉलेजमध्ये जायचं होतं. मात्र गुगल मॅपच्या मदतीने विद्यार्थीनी डिग्री कॉलेजजवळ पोहोचली. काही वेळानंतर तिला समजलं की, तिला दुसऱ्या केंद्रात जायचे आहे, परंतु ती तेथे पोहोचली तोपर्यंत तिला उशीर झाला होता. यामुळे तिला परीक्षा देता आली नाही.
विद्यार्थिनी अनुष्का यादवने सांगितले की, ती गुगल मॅपद्वारे तेथे पोहोचली आणि डिग्री महाविद्यालयाच्या रांगेत उभी राहिली. बागला नावाच्या डिग्री आणि इंटर कॉलेजच्या इमारती शहरात शेजारी शेजारी आहेत. यामुळे गोंधळ उडाला. अनुष्का यादवने सांगितले की, ती अलीगढची रहिवासी आहे. सकाळी दिल्लीहून अलीगडला पोहोचली. तिथून तिने गुगल मॅपच्या मदतीने कॉलेज गाठले.