स्मार्टफोनचा फोटो लीक करणं पडल महागात; Samsung ने कर्मचाऱ्याच्या बाबतीत घेतला मोठा निर्णय
लोकप्रिय स्मार्टफोन आणि टेक कंपनी सॅमसंग जानेवारी 2025 मध्ये आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज Galaxy S25 लाँच करण्याच्या तयारीत आहे. सॅमसंगच्या या सिरीजमध्ये 3 स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये Samsung Galaxy S25, Samsung Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra यांचा समावेश असू शकतो.
Christmas 2024: तुमच्या प्रियजनांना ख्रिसमसला गिफ्ट द्या हे गॅझेट्स, किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी
सॅमसंगने अद्याप या स्मार्टफोन सिरीजचा कोणताही फोटो शेअर केला नव्हता, तसेच या स्मार्टफोनच्या फिचर्सबद्दल देखील कंपनीने कोणतीही माहिती दिली नव्हती. मात्र अलीकडे अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे सॅमसंगने त्यांच्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंगच्या या कर्मचाऱ्यांनी लाँचपूर्वीच Galaxy S25 Ultra सिरीजच्या काही इमेज लीक केल्या आहेत. यामुळे कंपनीने या कर्मचाऱ्याची हकालपट्टी केली आहे. चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊया.(फोटो सौजन्य – pinterest)
एका अहवालानुसार, Samsung Galaxy S25 Ultra चे अलीकडेच काही फोटो समोर आले होते, मात्र कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे हे फोटो लीक झाल्याचं आता कंपनीनं सांगितलं आहे. ज्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना नोकरी गमावून त्रास सहन करावा लागला होता. कंपनीने किती कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला याबाबत सॅमसंगकडून सध्या कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
टिपस्टर इव्हान ब्लासच्या मते, गॅलेक्सी अनपॅक्ड 2025 इव्हेंट 22 जानेवारी रोजी आयोजित केला जाणार आहे. इटालियनमध्ये लिहिलेल्या या टीझरवर 22 जानेवारी 2025 ही तारीख आहे. Galaxy S25 सिरीजमध्ये बरेच बदल अपेक्षित आहेत, जरी Samsung ने अद्याप या सिरीजची अधिकृत लाँच डेट उघड केलेली नाही. तरी देखील ही स्मार्टफोन सिरीज जानेवारी 2025 मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे.
Samsung Galaxy S25 Ultra नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटद्वारे समर्थित असण्याची अपेक्षा आहे. Samsung Galaxy S25 आणि Galaxy S25 Plus स्मार्टफोन्समध्ये त्याच्या S24 सारखे डिझाईन दिले जाऊ शकते. S25 Ultra ची S24 अल्ट्रा पेक्षा थोडी वेगळी रचना असल्याची चर्चा आहे, जी याला अधिक प्रिमियम लुक देईल. Samsung Galaxy S25 अल्ट्रा मॉडेल्समध्ये नवीन 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा दर्शविणाऱ्या अहवालांसह, लक्षणीय कॅमेरा अपग्रेड समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे.
Upcoming Smartphones: 2025 मध्ये हे स्मार्टफोन्स घालणार धुमाकूळ, वाचा कोणात्या ब्रँड्सचा समावेश
सॅमसंगच्या सर्वात प्रगत आणि फ्लॅगशिप सीरिजमध्ये AI वैशिष्ट्यांचा विस्तार केला जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने Galaxy S24 सीरीज लाँच केली होती. ज्यामध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले होते. अशा परिस्थितीत आता Apple ने आपल्या iPhone 16 सीरीजमध्ये AI ची सुविधा देखील दिली आहे, त्यामुळे साहजिकच कंपनी या बाबतीत Apple च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे सॅमसंगच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज ai मध्ये मोठी क्रांती घडवून आणेल.