Alert! Android आणि iOS युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, 28 लोकप्रिय अॅप्समध्ये आढळला 'हा' धोकादायक व्हायरस
आयफोन आणि अंड्रॉईड स्मार्टफोन युजर्ससाठी एक महत्त्वाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरील 28 लोकप्रिय अॅप्समध्ये एक धोकादायक व्हायरल आढळला आहे. या व्हायरसमुळे युजर्सच्या वैयक्तिक आणि आर्थिक डेटाला मोठा धोका निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पार्ककॅट नावाचा धोकादायक व्हायरस गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरील लोकप्रिय अॅप्समध्ये आढळला आहे. यामुळे अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही वापरकर्त्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
‘कर्मचाऱ्यांनी ChatGPT आणि DeepSeek वापरू नये…’, केंद्र सरकारने दिला इशारा! काय आहे कारण?
अहवालांनुसार, लाखो आयफोन आणि अँड्रॉईड स्मार्टफोन्सवर स्पार्ककॅट आढळला असून या युजर्सवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. स्पार्ककॅट तुमचा डेटा, वैयक्तिक माहिती चोरू शकते, आर्थिक डेटा धोक्यात आणू शकते आणि क्रिप्टोकरन्सी वॉलेट रिकव्हरी फ्रेजमध्ये प्रवेश देखील करू शकते. अशी संवेदनशील माहिती चुकीच्या हातात पडल्यास युजर्सचं मोठं नुकसान होऊ शकतं. यामुळे आइडेंटिटी थेफ्ट देखील होऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
सायबरसुरक्षा फर्म कॅस्परस्कीने स्पार्ककॅटबद्दल इशारा जारी केला आहे. कॅस्परस्कीने स्पार्ककॅट हे धोकादायक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट (SDK) असल्याचं सांगितलं आहे. हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट काही अॅप्समध्ये लपलेले असतात. हे अॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअर दोन्हीवर उपलब्ध आहेत. या मालवेअरमध्ये डेटा चोरण्याची प्रगत क्षमता आहे. ते डिव्हाइसचे फोटो स्कॅन करून वैयक्तिक माहिती देखील गोळा करू शकते.
कॅस्परस्कीच्या अहवालात असे सांगण्यात आलं आहे की, 28 अॅप्समध्ये स्पार्ककॅट आढळले आहे. यापैकी 18 अँड्रॉइड आणि 10 आयओएस अॅप्स आहेत. विशेषतः ‘ChatAI’ हे एक लोकप्रिय अॅप आहे, ज्यामध्ये हा धोकादायक मालवेअर आढळला आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या डिव्हाइसवरून हे अॅप्स त्वरित डिलीट करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये ChatAi किंवा इतर कोणतेही संशयास्पद अॅप असल्यास, ते ताबडतोब अनइंस्टॉल करा आणि तुमचा डेटा सुरक्षित करा.
फोनचे फोटो स्कॅन करते – स्पार्ककॅट तुमच्या फोनवरील इमेज स्कॅन करते, विशेषतः क्रिप्टो वॉलेट रिकव्हरी फ्रेजशी संबंधित माहिती काढण्यासाठी याचा वापर केला जातो.
ओसीआर तंत्रज्ञान वापरते – ते गुगल एमएल किट ओसीआर वापरून प्रतिमांमधील मजकूर वाचते आणि संवेदनशील माहिती चोरू शकते.
वेगवेगळ्या भाषा ओळखू शकतो – हे मालवेअर इंग्रजी, हिंदी, चिनी, जपानी, फ्रेंच, इटालियन यासह अनेक भाषांमधील कीवर्ड ओळखण्यास सक्षम आहे, ज्यामुळे ते अत्यंत धोकादायक बनते.