
फोटो सौजन्य: Gemini
सध्या प्रत्येक क्षेत्रात AI चे वारे जोराने वाहत आहे. यूट्यूबवर देखील अनेक जण AI च्या मदतीने व्हिडिओ बनवत आहे. अशाच एका एका भारतीय यूट्यूब चॅनलने AI व्हिडिओ बनवून थेट वर्षाला 38 कोटी रुपये कमावल्याची चर्चा रंगली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
AI-जनरेटेड कंटेंट पोस्ट करणाऱ्या यूट्यूब चॅनेल्सच्या जागतिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की ‘बंदर अपना दोस्त’ हे भारतीय चॅनेल जगभरात सर्वाधिक पाहिले जाणारे चॅनेल आहे. व्हिडिओ एडिटिंग प्लॅटफॉर्म कपविंगने केलेल्या या अभ्यासात एआय-जनरेटेड व्हिडिओंच्या प्रमाण आणि प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी जगातील 15000 सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनेल्सचे विश्लेषण केले गेले, ज्यामध्ये “बंदर अपना दोस्त” हे सर्वाधिक पाहिले जाणारे चॅनेल ठरले आहे.
कपविंगच्या एका अभ्यासानुसार, या चॅनेलला 2.07 अब्ज व्ह्यूज मिळाले आहे. तसेच या चॅनेलचे 2.76 दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. उत्पन्नाच्या बाबतीत, हे चॅनेल दरवर्षी अंदाजे 38 कोटी कमावते. हे चॅनेल माकड पात्रांसह लहान व्हिडिओ क्लिप अपलोड करते. या चॅनेलचे यश हे दर्शवते की कमी किमतीचे, पूर्णपणे एआय-निर्मित व्हिडिओ संपूर्ण जगापर्यंत कसे पोहोचू शकतात.
रिकमंडेशनच्या दृष्टीने पाहिले तर यूट्यूबही एआयद्वारे तयार केलेल्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देत आहे. एका अभ्यासानुसार, नव्या युजर्सना सुचवले जाणारे एकूण व्हिडिओंपैकी सुमारे 20 टक्के व्हिडिओ ‘एआय स्लोप’ कॅटेगरीत येतात. एआय स्लोप म्हणजे असे व्हिडिओ, जे पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केले जातात आणि ज्यामध्ये मानवी सर्जनशीलता फारच कमी किंवा जवळपास नसतेच.
विशेषतः YouTube Shorts बाबतीत एआय व्हिडिओंचा प्रभाव आणखी ठळकपणे दिसून येतात. एखाद्या नव्या युजरला दाखवण्यात येणाऱ्या पहिल्या 500 शॉर्ट्सपैकी तब्बल 33 टक्के शॉर्ट्स एआय स्लोप प्रकारातील असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. यावरून स्पष्ट होते की, यूट्यूबचा अल्गोरिदम अशा कंटेंटला अधिक फेव्हर करत आहे, जो प्रेक्षकांना सतत गुंतवून ठेवतो, जरी त्या कंटेंटची क्वालिटी फारशी दमदार नसली तरीही.