Year Ender 2024: 2024 मध्ये लाँच झाले हे टॉप Earbuds, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फीचर्स
2024 मध्ये अनेक फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजीसह नवीन गॅझेट लाँच करण्यात आले. यामध्ये स्मार्टफोन, इअरबड्स, टिव्ही, लॅपटॉप इत्यादींचा समावेश आहे. 2024 मध्ये प्रत्येक डिव्हाईसने त्याची एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली होती. काही गॅझेट्स प्रचंड हिट ठरले. आता आम्ही तुम्हाला 2024 मध्ये लाँच करण्यात आलेल्या प्रीमियम ते मिड-रेंज इयरबड्सबद्दल सांगणार आहोत. यामध्ये अॅपल, सॅमसंग, नॉईज आणि वनप्लस सारख्या ब्रँडच्या नावांचा समावेश आहे. या वर्षी लाँच झालेल्या टॉप इयरबड्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
‘Poco C75 5G’ ला टक्कर देणार ‘itel’ चा हा आगामी स्मार्टफोन, इतकी असणार किंमत
W10 TWS बड्स ब्लूटूथ 5.4 सह लाँच करण्यात आले आणि या इअरबड्सची बॅटरी लाईफ 55 तासांची आहे. फास्ट चार्जिंग 10 मिनिटांत 150 मिनिटे प्लेबॅक प्रदान करते. यामध्ये असलेले 13mm ड्रायव्हर्स आणि BoomX टेक्नोलॉजी स्पष्ट आणि खोल आवाज देतात. बड्स आवाज कमी करतात आणि गेमिंग-चित्रपटांसाठी उत्कृष्ट ऑडियो क्वालिटी देतात. तसेच, K10 TWS बड्स कॉम्पॅक्ट डिझाइनसह येतात. यामध्ये ब्लूटूथ 5.4 आणि IPX5 रेटिंग आहे. यामध्ये 50 तासांची बॅटरी लाइफ आणि 45ms अल्ट्रा लो लेटन्सीसह गेमिंग मोडसाठी सपोर्ट आहे. W10 TWS ची सुरुवातीची किंमत 1,099 रुपये आहे आणि K10 TWS ची किंमत 799 रुपये आहे.
हे इअरबड्स 32db पर्यंत ANC आणि AI Clear Call फीचरसह लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये असलेले 12.4 मिमी डायफ्राम आणि BassWave 2.0 टेक्नोलॉजीच्या खोल बासचा अनुभव देते. त्याची बॅटरी लाइफ 43 तास आहे आणि जलद चार्जिंग 10 मिनिटांत 11 तासांचा प्लेबॅक टाइम देते. यात IP55 रेटिंग आणि ड्युअल कनेक्शन सपोर्ट देखील आहे. त्यांची सुरुवातीची किंमत 2,299 रुपये आहे.
Galaxy Buds 3 हे प्रीमियम इयरबड्स आहेत. यात 515mAh बॅटरी आहे. चांगल्या आवाजासाठी, त्यात 11 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स सपोर्ट देण्यात आला आहे. यात 360 डिग्री सराउंड ऑडिओसाठी सपोर्ट आहे. या इयरबड्सची किंमत 14,999 रुपये आहे
हे इयरबड्स स्टायलिश ड्युअल-टोन डिझाइनसह येतात. इयरबड्समध्ये 13 मिमी ड्रायव्हर्स, क्वाड मायक्रोफोन आणि इनवायरमेंटल नॉइस कँसलेशन सारखे फीचर्स आहे. Bluetooth 5.3 आणि HyperSync तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या, या बड्स 50ms लो-लेटन्सी गेमिंग मोड आणि 50 तासांची बॅटरी लाइफ देतात. इयरबड्स IPX5 रेट केलेल्या आहेत आणि त्यांची किंमत फक्त 1,299 रुपये आहे.
Apple च्या अपकमिंग iPhone पेक्षाही पातळ असेल Samsung चा हा स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स झाले लिक
या वर्षी लॉन्च झालेल्या Apple Airpods 4 मध्ये Siri सपोर्ट देण्यात आला आहे. इयरबड्स वायरलेस चार्जिंगसह येतात. त्याची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 30 तासांचा बॅटरी बॅकअप देते. बाहेरील आवाज कमी करण्यासाठी यामध्ये अॅक्टिव नॉइस कँसलेशन सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय इयरबड्समध्ये ट्रांसपरंसी मोडही देण्यात आला आहे. या बड्सची किंमत 12900 रुपये आहे.