'Poco C75 5G' ला टक्कर देणार 'itel' चा हा आगामी स्मार्टफोन, इतकी असणार किंमत'Poco C75 5G' ला टक्कर देणार 'itel' चा हा आगामी स्मार्टफोन, इतकी असणार किंमत
काही दिवसांपूर्वीच स्मार्टफोन कंपनी Poco ने त्यांचा नवीनतम स्मार्टफोन Poco C75 5G लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील यामध्ये अनेक मजेदार फीचर्स देण्यात आले आहेत. आता Poco C75 5G स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी itel चा नवीन स्मार्टफोन itel Awesome A80 लवकरच बाजारात लाँच होणार आहे. हा आगामी स्मार्टफोन देखील बजेट सेगमेंटमध्ये लाँच होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Apple च्या अपकमिंग iPhone पेक्षाही पातळ असेल Samsung चा हा स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स झाले लिक
itel भारतात लवकरच आपला एंट्री-लेव्हल A सीरीज स्मार्टफोन itel Awesome A80 लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा स्मार्टफोन A सीरीज अंतर्गत लाँच केला जाणार आहे. लाँचिंगपूर्वीच कंपनीने या आगामी स्मार्टफोनचे टिझर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. या टीझरमध्ये बॅक डिझाइनचे तपशील आणि डिव्हाइसचे काही वैशिष्ट्ये आढळले आहेत. (फोटो सौजन्य – X)
टीझर पोस्टरमध्ये उच्च-रिफ्रेश-रेट डिस्प्ले जोडल्याचा संदर्भ देत ‘स्मूथेस्ट’ असे लिहिले आहे. itel A80 आधीच जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन आणि मध्यभागी पंच-होल सेल्फी कॅमेरा आहे. एंट्री-लेव्हल सेगमेंट लक्षात घेऊन, कंपनीने उच्च-रिफ्रेश-रेट पॅनेल प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शिवाय, यात 500 nits पर्यंत पीक ब्राइटनेससह मोठा 6.7-इंचाचा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. यात पंच-होल सेल्फी कॅमेरा आहे, त्यामुळे इतर आयटेल स्मार्टफोन्सप्रमाणे यात देखील डायनॅमिक बार वैशिष्ट्य असू शकतात.
स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50MP HDR कॅमेरा आणि समोर 8MP सेल्फी शूटर आहे. यात 128GB स्टोरेज, 5000mAh बॅटरी, IP54 रेटिंग आणि Type-C चार्जिंग पोर्ट आहे. याशिवाय कंपनी 36 महिन्यांहून अधिक काळासाठी उत्तम यूजर एक्सपीरियंस देण्याचे वचन देते.
itel Awesome A80 लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. येत्या काही दिवसांत त्याचे अधिकृत लाँचिंग उघड होऊ शकते. या फोनची किंमतही खूपच कमी असण्याची शक्यता आहे. कंपनीने 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज सह itel A70 स्मार्टफोन 6,299 रुपयांना आणला होता. अशा परिस्थितीत, अशी अपेक्षा केली जाऊ शकते की itel Awesome A80 स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच केले जाईल.
डिस्प्ले- या फोनमध्ये 6.6 इंच LCD डिस्प्ले आहे, जो 500nits ब्राइटनेस, HD + (720 × 1612) रिझोल्यूशन, 120Hz टच सॅम्पलिंग रेट आणि डायनॅमिक बारसह जोडलेला आहे.
प्रोसेसर- itel A70 मध्ये PowerVR GE8322 GPU सह UniSoC T603 प्रोसेसर आहे.
रॅम- यात 4GB रॅम आणि 8GB विस्तारित रॅमची सुविधा आहे.
स्मार्टफोनचा फोटो लीक करणं पडल महागात; Samsung ने कर्मचाऱ्याच्या बाबतीत घेतला मोठा निर्णय
स्टोरेज- Itel A70 मध्ये तीन स्टोरेज पर्याय आहेत, ज्यामध्ये 64GB, 128GB आणि 256GB स्टोरेज समाविष्ट आहे.
कॅमेरा- या फोनमध्ये 13MP प्राथमिक कॅमेरा, AI कॅमेरा आणि LED फ्लॅशची सुविधा आहे. आणि सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
बॅटरी आणि चार्जिंग- itel A70 मध्ये 5000mAh, USB Type-C चार्जिंग पोर्ट आहे.