Google Map Update: गुगल मॅपमुळे आपण चुकीच्या ठिकाणी कसं पोहोचतो? काय आहेत कारण?
गुगल मॅप हे नेव्हिगेशनचे सर्वात विश्वसनीय अॅप आहे. गुगल मॅप आपल्याला केवळ मार्गच दाखवत नाही तर रहदारीची माहिती देखील देते. अनेकदा असे घडते की गुगल मॅप आपल्याला चुकीच्या ठिकाणी घेऊन जाते. गेल्या काही दिवसांत गुगल मॅपमुळे झालेल्या अपघातांची संख्या प्रचंड वाढली आहे. अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, जे अपघात गुगल मॅपमुळे झाले आहेत.
Google Map Update: प्रवास करताना टोलचे पैसे वाचवायचे? गुगल मॅपची ही ट्रीक करणार मदत
काही दिवसांपूर्वी एक अशी घटना समोर आली होती, ज्यामध्ये गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्यावर कार जात होती. काही अंतरावर जाताच ती गाडी नदीत कोसळली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता. एका अपघातात गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्यावरून जाताना दुचाकी खांबाला धडकली होती. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला होता, तर एकजण गंभीर जखमी झाला होता. एका घटनेत गुगल मॅपमुळे एक कुटूंब जंगलात अडकले होते. अशी अनेक प्रकरण आहेत ज्यामध्ये प्रवासी गुगल मॅपमुळे रस्ता चुकले आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
पण या सर्व अपघातानंतर असा प्रश्न आता निर्माण होत आहे की, गुगल मॅपमुळे आपण रस्ता नेमका चुकतो तरी कसा? यामागचं कारण नेमकं आहे तरी काय? या सर्वांवरचा उपाय काय आहे? याबद्दल आता जाणून घेऊया.
गुगल मॅपच्या डेटाचा आधार यूजर्सचा रिपोर्ट आणि सार्वजनिक माहिती आहे. एखाद्या स्थानाचा डेटा चुकीचा किंवा अपूर्ण असल्यास, गुगल मॅप चुकीचे स्थान दर्शवू शकतो.
जेव्हा तुमचा फोन कमकुवत GPS सिग्नल पकडतो, तेव्हा लोकेशन अचूक नसते. ही समस्या घनदाट जंगले, डोंगराळ भागात किंवा खराब हवामानात उद्भवते.
काहीवेळा लोक मॅन्युअली गुगल मॅपवर चुकीचे स्थान जोडतात, ज्यामुळे गोंधळ निर्माण होतो.
मार्गावर नवीन बांधकाम सुरु असल्यास किंवा रस्ता बंद असल्यास मॅपवर ही माहिती अपडेट करणं गरेजंच आहे. गुगल मॅपवर जुन्या मार्गाची माहिती योग्यरित्या अपडेट न केल्यास रस्ता चुकण्याच्या समस्या निर्माण होतात.
एखाद्या ठिकाणी जाण्यापूर्वी, त्याचे नाव आणि पत्ता काळजीपूर्वक तपासा.
लोकेशन बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी मॅपला सॅटेलाइट व्यूमध्ये बदला.
Google Map Update: गुगल मॅप ठरतोय अपघाताचं कारण? सुरक्षित प्रवासासाठी लक्षात ठेवा या टीप्स
प्रवास करण्यापूर्वी, त्या भागाचा ऑफलाइन मॅप डाउनलोड करा जेणेकरून इंटरनेट नसतानाही तुम्हाला योग्य मार्ग सापडेल.
गुगल मॅपवर स्थानाची रिव्यू वाचा. हे चुकीचे स्थान होण्याची शक्यता कमी करते.
मार्गाबद्दल काही शंका असल्यास, स्थानिक लोकांना विचारणे चांगले. गुगल मॅप्स हे एक अप्रतिम तंत्रज्ञान आहे, पण त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. थोडी सावधगिरी बाळगल्यास, आपण चुकीच्या ठिकाणी पोहोचणे टाळू शकता आणि आपला प्रवास सुलभ करू शकता.