'डिजिटल स्ट्राईक' करत व्हॉट्सअॅप युजर्सना सरकार देणार झटका;
लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स लाँच करत असतो. या नवीन फीचर्समुळे युजर्सचा व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव अधिक मजेदार होतो. नुकतंच व्हॉट्सॲपने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर शेअर केलं आहे. या फीचरमध्ये युजर्सना व्हॉट्सॲप स्टेटस इंस्टाग्रामच्या स्टोरीप्रमाणे दिसत आहेत. या जबदरस्त फीचरनंतर आता व्हॉट्सॲप त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच करणार आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांसाठी कोणतंही चॅनेल शेअर करणे आणि कनेक्ट करणे खूप सोपे होणार आहे. या नवीन फीचरमध्ये, व्हॉट्सॲप चॅनेल शेअर करण्यासाठी क्यूआर कोडची सुविधा देणार आहे. या क्यूआर कोडच्या मदतीने कोणीही तो थेट स्कॅन करून चॅनलशी कनेक्ट होऊ शकतो. या नवीन फीचरमुळे कोणत्याही चॅनेलला कनेक्ट होणं अतिशय सोपं होणार आहे. अगदी चुटरीसरशी तुम्ही व्हॉट्सॲप चॅनलवर कनेक्ट होऊ शकणार आहात. (फोटो सौजन्य – pinterest)
यापूर्वी चॅनल शेअर करण्यासाठी त्याची लिंक कॉपी पेस्ट करावी लागत होती. त्यानंतर वापरकर्ता त्याला मॅन्युअली कनेक्ट करू शकतो. पण या नवीन क्यूआर कोड फीचरमुळे ही प्रक्रिया खूप सोपी होणार आहे.
WABetaInfo च्या अहवालानुसार, हा क्यूआर कोड डिजिटल आणि फिजिकली दोन्ही प्रकारे शेअर केला जाऊ शकतो. अहवालात नमूद करण्यात आले आहे की क्यूआर कोडच्या परिचयामुळे चॅनेल शेअरिंग अधिक सोयीस्कर झाले आहेत. आता चॅनेलसाठी लिंक वापरण्याची गरज भासणार नाही. या वैशिष्ट्याच्या मदतीने, लोक अतिरिक्त स्टेप्सशिवाय कोड लगेच स्कॅन करू शकतात. स्कॅन केलेला कोड वापरकर्त्यांना थेट चॅनेलवर रीडायरेक्ट करेल, जिथे ते त्याच्या संपूर्ण कंटेटमध्ये प्रवेश करू शकतात.
रिपोर्टनुसार, सध्या अँड्रॉईडवर व्हॉट्सॲप बीटामध्ये या फीचरची चाचणी सुरू आहे. ते वापरण्यासाठी वापरकर्ते त्यांच्या आवडत्या चॅनेलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन शेअर कोड पर्यायावर क्लिक करू शकतात. हे एक क्यूआर कोड जनरेट करेल, जो स्कॅन करण्यासाठी इतरांसोबत शेअर केला जाऊ शकतो. वापरकर्ते क्यूआर कोड प्रतिमा थेट व्हॉट्सॲप किंवा इतर प्लॅटफॉर्मद्वारे शेअर करू शकतात.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
जे व्यवसाय किंवा ग्रुप व्हॉट्सॲप चॅनेल वापरतात त्यांच्यासाठी क्यूआर कोडचा परिचय अधिक फायदेशीर आहे. ते आता त्यांच्या चॅनेलचा क्यूआर कोड व्यवसाय कार्ड सारख्या गोष्टींवर शेअर करू शकतात, ज्यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे होईल.
यापूर्वी व्हॉट्सॲपने गुरुवारी एक नवीन फीचर जारी केले, जे व्हॉईस मेसेज शेअरिंगला अधिक सोयीस्कर बनवू शकते. कंपनीने व्हॉट्सॲपच्या Android आणि iOS प्लॅटफॉर्मसाठी नवीन वॉयस मॅसेज ट्रांसक्रिप्ट फीचर सादर केले आहे. यासह, वापरकर्ते इतरांकडून प्राप्त झालेल्या व्हॉइस संदेशांचे टेक्स्ट-आधारित ट्रान्सक्रिप्शन पाहू शकतील. वापरकर्ते कुठेतरी प्रवास करत असताना किंवा गोंगाटाच्या ठिकाणी अडकले असताना हे वैशिष्ट्य विशेषतः उपयुक्त ठरेल.