Huawei चा नवा फोल्डेबल फोन लाँच, ट्रिपल-नेटवर्क सॅटेलाइट सपोर्टने सुसज्ज! किंमत जाणून घ्या
नवीन फोल्डेबल स्मार्टफोन Huawei Mate X6 चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या बुक स्टाइल फोल्डेबल फोनमध्ये 7.93-इंचाचा मुख्य डिस्प्ले आणि 6.45-इंचाचा आऊटर डिस्प्ले देण्यात आला आहे. Huawei Mate X6 स्मार्टफोन पाच रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IPX8 रेट केलेला आहे. Huawei Mate X6 सिरीजमध्ये दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
सध्या कंपनीने अधिकृतपणे या फोनच्या प्रोसेसरबद्दल माहिती दिलेली नाही. मात्र, असं सांगितलं जात आहे की हा फोन किरिन 9100 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. Huawei Mate X6 स्टँडर्ड आणि कलेक्टर एडिशन या दोन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल-नेटवर्क सॅटेलाइट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
The Huawei Mate X6 च्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 12,999 म्हणजेच अंदाजे 1,50,000 रुपये आणि 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 13,999 म्हणजेच अंदाजे 1,64,000 रुपये आहे.
Huawei Mate X6 कलेक्टर एडिशनच्या 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 14,999 म्हणजेच अंदाजे 1,75,000 रुपये आहे. तर 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 15,999 म्हणजेच अंदाजे 1,85,000 रुपये आहे. तुम्ही हा स्मार्टफोन कॉस्मिक रेड, डीप सी ब्लू, नेबुला व्हाइट, नेबुला ग्रे आणि ओब्सीडियन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता.
Huawei Mate X6 स्मार्टफोन HarmonyOS 4.3 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 7.93-इंचाचा (2,440×2,240 पिक्सेल) इंटरनल OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनमध्ये 6.45-इंचाचा (1,080×2,440 पिक्सल) क्वाड-कर्व्ड OLED एक्सटर्नल डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 1440Hz उच्च-फ्रिक्वेंसी PWM डिमिंग आणि 300Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट आहे. मुख्य आणि कव्हर दोन्ही डिस्प्लेमध्ये 1Hz ते 120Hz पर्यंत अडॅप्टिव रिफ्रेश रेट आहेत. स्क्रीनला कुनलुन ग्लास प्रोटेक्शन देखील आहे. Huawei Mate X6 कलेक्टर एडिशनमध्ये सेकंड-जेनरेशन बेसाल्ट-टेम्पर्ड कुनलुन ग्लास प्रोटेक्शन आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
नवीन Huawei फोल्डेबलमधील प्रोसेसरची अद्याप अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. परंतु या स्मार्टफोन सिरीजमध्ये किरिन 9100 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. Huawei Mate X6 मध्ये 12 GB रॅम उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 256 GB आणि 512 GB स्टोरेज पर्यायांसह लाँच करण्यात आला आहे.
Huawei Mate X6 कलेक्टर एडिशनमध्ये 16GB ऑनबोर्ड RAM आहे. हा फोन 512GB, 1TB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कलेक्टर्स एडिशनमध्ये ट्रिपल-नेटवर्क सॅटेलाइट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सलचा वाइड-एंगल कॅमेरा, 40-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 48-मेगापिक्सेलचा टेलीफोटो मॅक्रो कॅमेरा आहे.
सेल्फीसाठी हँडसेटमध्ये 8 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत. हे आतील आणि बाहेरील दोन्ही डिस्प्लेवर स्थापित केले गेले आहेत. Huawei Mate X6 मध्ये 5,110mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 66W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 7.5W वायरलेस रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. Huawei Mate X6 कलेक्टर एडिशनमध्ये 5,200mAh बॅटरी आहे आणि तिचे वजन सुमारे 239 ग्रॅम आहे.