व्हॉट्सॲप करणार फॅक्ट चेक, ओळखणार खरे - खोटे फोटो! लवकरच येणार नवीन फीचर
लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप दररोज करोडो लोक वापरतात. तुमचे मित्र आणि कुटुंबीयांसोबत डिजीटल पद्धतीने कनेक्ट होण्याचा व्हॉट्सॲप हा एक मजेदार मार्ग आहे. व्हॉट्सॲप युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे आपल्या युजर्सचा अनुभव अधिक सुधारण्यासाठी कंपनी वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणत असते. परंतु काही फ्रॉडर्स या अपडेट्सचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात आणि व्हॉट्सॲपवर बनावट फोटो आणि खोटी माहिती शेअर करतात.
हेदेखील वाचा- WhatsApp Tricks: या आहेत WhatsApp च्या काही जबरदस्त ट्रीक्स, चॅट्स करताना ठरतील फायदेशीर
अनेकदा व्हॉट्सॲप युजर्स फ्रॉडर्सने शेअर केलेल्या या बनावट फोटोला भुलतात, ज्यामुळे त्यांची फसवूणक होते. आता अशा घटनांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सॲपने एक नवीन फीचर लाँच केलं आहे. युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी, मेटाच्या मालकीचे प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप नवीन फीचर लाँच करत आहे. आता कंपनी एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्यामुळे बनावट फोटोंना आळा घालण्यास मदत होईल. नवीन फीचर आल्यानंतर युजर्सना व्हॉट्सॲपवर फोटोचे सत्य कळू शकेल. या नवीन फीचरच्या मदतीने बनावट फोटोंबाबत शोध घेणे सोपे होणार आहे. चुकीची माहिती आणि अफवा टाळण्यासाठी कंपनी हे फीचर आणत आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
व्हॉट्सॲपचे नवीन फीचर सध्या विकासाच्या टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत हे फीचर सर्व युजर्ससाठी आणले जाऊ शकते. हे फीचर WABetainfo वर दिसले आहे. रिव्हर्स सर्च इमेज असे या फीचरचे नाव आहे. बिल्ड क्रमांक 2.24.2313 सह WebBeta वर हे फीचर दिसले आहे. हे फीचर iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर काही निवडक युजर्ससाठी बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.
व्हॉट्सॲपचे नवीन फीचर प्लॅटफॉर्म न सोडता फोटोचे खरे किंवा खोटे सत्य जाणून घेण्यास मदत करणार आहे. वास्तविक, हे करण्यासाठी, युजर्सना आता प्रथम व्हॉट्सॲपवरून एक फोटो डाउनलोड करावा लागतो आणि त्यानंतर त्यांना फोटोबद्दल माहिती मिळते. मात्र, नवीन फीचर उपलब्ध झाल्यानंतर हे काम सोपं होणार आहे. युजर्सना फोटोवर क्लिक करताच फोटो बनावट आहे की खरा याबद्दल माहिती मिळणार आहे.
हेदेखील वाचा- चोरुन वाचले जात आहेत तुमचे WhatsApp चॅट्स? तुमची नकळत केलेली चूकसुद्धा महागत पडेल
हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला आधी व्हॉट्सॲप ओपन करून तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला सर्च ऑन वेब या पर्यायावर टॅप करावे लागेल. या ऑप्शनवर टॅप करताच तुम्हाला फोटोची सत्यता समजणार आहे.
याशिवाय व्हॉट्सॲप स्टिकर प्रॉम्प्ट फीचरवरही काम करत आहे. सध्या हा फीचरची चाचणी सुरू आहे. येत्या काही दिवसांत ते स्टेबल वापरकर्त्यांसाठी आणले जाईल अशी अपेक्षा आहे. हे स्टिकर वापरकर्त्यांना इंटरॅक्टिव प्रॉम्प्ट तयार करण्यास अनुमती देईल. या फीचरबद्दल जास्त माहिती देण्यात आलेली नाही.