Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Year Ender 2024: 2024 मध्ये इंस्टाग्रामवर भारतीयांचा जलवा, Meta ने शेअर केल्या खास गोष्टी

मेटाने 2024 वर्षाबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. 2024 हे वर्ष भारतासाठी खूप खास होते. 2024 मध्ये भारतीय कलाकारांनी आणि कंटेट क्रिएटर्सने सोशल मीडिया अ‍ॅप इंस्टाग्रामवर अनेक नवीन ट्रेंड फॉलो केले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 12, 2024 | 10:10 AM
Year Ender 2024: 2024 मध्ये इंस्टाग्रामवर भारतीयांचा जलवा, Meta ने शेअर केल्या खास गोष्टी

Year Ender 2024: 2024 मध्ये इंस्टाग्रामवर भारतीयांचा जलवा, Meta ने शेअर केल्या खास गोष्टी

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया अ‍ॅप इंस्टाग्रामचे जगभरात लाखो युजर्स आहेत. इंस्टाग्रावर अनेक लोक त्यांच्या वेगवेगळ्या कंटेटच्या रिल्स शेअर करतात. या रिल्सवर जगभरातून प्रतिक्रिया दिल्या जातात. हे असं संपूर्ण वर्षभर सुरु असतं. त्यानंतर वर्षाच्या शेवटी मेटा संपूर्ण वर्षाचे रिव्ह्यु शेअर करतो. आता देखील मेटाने 2024 साठी इंस्टाग्रामचे संपूर्ण वर्षाचे रिव्ह्यु शेअर केले आहेत. आपल्या सर्वांसाठीच आनंदाची बातमी म्हणजे 2024 मध्ये इंस्टाग्रामवर भारतीयांचा जलवा होता.

Meta apps down: मेटाचे सोशल मीडिया ॲप्स डाऊन, युजर्स हैराण! एक्सवर मीम्सचा पाऊस

2024 वर्ष भारतासाठी खूप खास

मुंबईत मेटा फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी मेटाने 2024 वर्षाबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. मेटाने एक अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये 2024 मध्ये इंस्टाग्रामवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गोष्टींबद्दल माहिती देण्यात आली आहे. 2024 हे वर्ष भारतासाठी खूप खास होते. यावर्षी भारतीय कलाकार आणि कंटेट क्रिएटर्सनी इंस्टाग्रामवर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय अनेक सामान्य लोकांनी देखील त्यांच्या कामगिरीमुळे इंस्टाग्रामवर प्रसिद्धी मिळवली आहे. जगभरातील लोकांनी भारतीयांच्या संस्कृतीचे पालन केलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

भारतीय कलाकारांनी जगाला प्रभावित केलं

2024 मध्ये भारतीय कलाकारांनी आणि कंटेट क्रिएटर्सने परदेशी कलाकारांसोबत खूप चांगली गाणी तयार केली. दिलजीत दोसांझने अमेरिकन रॅपर सवेथीसोबत ‘खुट्टी’ हे गाणे तयार केले. किंगने निक जोनाससोबत ‘मान मेरी जान’ गाणं बनवलं आणि हर्ष लिकारीने कॉनर प्राइससोबत ‘कस्टम्स’ गाणं बनवलं.

जगभरात भारतीय संस्कृती परसली

2024 मध्ये जगाने भारतीय संस्कृतीचा स्वीकार केला आणि भारतीय ट्रेंडही जगभरात लोकप्रिय झाले. केवळ भारतच नाही तर जगातील इतर देशांतील लोकांनाही भारतीय गोष्टी खूप आवडू लागल्या. इंडोनेशिया, नायजेरिया आणि स्लोव्हाकियातील लोकांनी अशोका मेकअप ट्रेंड फॉलो केला. जपानमधील लोक बॉलिवूड चित्रपटांच्या गाण्यांवर नाचू लागले. परदेशी कंटेट क्रिएटर्सनीही भारतीय भाषांमध्ये कंटेट तयार करण्यास सुरुवात केली.

भारतातील गाण्यांना जगभरात पसंती

2024 मध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातील गाणी इंस्टाग्रामवर हिट झाली. लोकांना फक्त हिंदी गाणीच नाही तर हरियाणवी, पंजाबी, मराठी, तमिळ आणि भोजपुरी गाणीही आवडली. यात जले 2, वे हनिया, गुलाबी साडी, असा कुडा, बंदुक यांसारख्या अनेक गाण्यांचा समावेश आहे, ज्यावर लोकांनी अनेक रील बनवल्या आहेत. त्यांच्या या रिल्स प्रचंड व्हायरल देखील झाल्या.

लवकरच लाँच होणार अ‍ॅपलचा नवीन Macs, मिळणार सिम कार्ड सपोर्ट! Wi-Fi ची गरज नाही

चित्रपट देखील हिट झाले

जुन्या चित्रपटांसोबतच चित्रपट आणि वेब सीरिजही हिट झाल्या होत्या. मिर्झापूर, पंचायत आणि लापता लेडीज सारख्या वेब सिरीज प्रचंड हिट झाल्या. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ‘रॉकस्टार’ आणि ‘लैला मजनू’ सारखे जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणे लोकांना आवडले. ‘फ्रेंड्स’लाही लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. ‘हेरा फेरी’चे मीम्सही सोशल मीडियावर लोकप्रिय झाले.

या लोकांना मिळाली प्रसिद्धी

भारतात खेळांची क्रेझ दरवर्षी वाढत आहे. या वर्षीही भारतीय खेळाडूंना क्रिकेट विश्वचषक, ऑलिम्पिक आणि वुमन्स प्रीमियर लीग (WPL) मध्ये भरपूर पाठिंबा मिळाला. दरवर्षी काही नवे लोक प्रसिद्धीच्या झोतात येतात. यावर्षी हनुमानकाइंड, नॅन्सी त्यागी, डॉली चाय वाला आणि वडा पाव गर्ल यांनी लोकांची मने जिंकली.

Web Title: Tech news year ender 2024 meta share instagram review for the year 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2024 | 10:10 AM

Topics:  

  • Tech News
  • Year Ender 2024

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.