Moto चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, ऑफर्सबद्दल अधिक जाणून घ्या
टेक कंपनी Moto ने अलीकडेच त्यांचा प्रिमियम डिझाईनवाला स्मार्टफोन Moto G85 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन आता कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर Moto G85 हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हा फोन एका प्रिमियम डिझाईन आणि क्लासी लूकसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आल होता. या स्मार्टफोनचा 12GB रॅम+256GB स्टोरेज हा व्हेरिअंट आता तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
अरे चाललंय तरी काय? गुगल मॅपने पुन्हा दाखवला चुकीचा रस्ता, गोव्याला जाणारं कुटूंब जंगलात अडकलं
Moto G85 स्मार्टफोनचा 12GB रॅम+256GB स्टोरेज हा व्हेरिअंट 19,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र आता ऑफर्स आणि डिस्काऊंटसह तुम्ही हा मॉडेल अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता. बजेट किंमतीत हा फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुम्ही फ्लिपकार्टवरून बँक आणि एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन कमी किंमतीत खरेदी करू शकता. या फोनमध्ये जबरदस्त स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. चला, या फोनवर उपलब्ध डील आणि त्याच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
Moto G85 स्मार्टफोनच्या खरेदीवर तुम्हाला Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे. Axis Bank क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळेल. IDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर 1000 रुपये वाचवण्याचीही संधी आहे. यावर 1200 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. हा स्मार्टफोन कोबाल्ट ब्लू, ऑलिव्ह ग्रीन, अर्बन ग्रे आणि व्हिवा मॅजेन्टा रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
डिस्प्ले – Moto G85 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ poOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 6s Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे.
कॅमेरा – Moto G85 स्मार्टफोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. सेल्फी प्रेमींसाठी यात 8MP अल्ट्रावाइड सेन्सर आणि 32MP कॅमेरा प्रदान केला जात आहे.
Most Visited Website: लोकं कोणत्या वेबसाइट्सना सर्वाधिक भेट देतात माहित आहे का? जाणून घ्या
फीचर्स – Moto G85 स्मार्टफोनमध्ये सुरक्षिततेसाठी, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, डॉल्बी ॲटमॉस आणि IP54 रेटिंगसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर देण्यात आले आहेत.
बॅटरी – Moto G85 स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कमी किंमतीत तुम्ही चांगला फोन शोधत असाल, तर Moto G85 स्मार्टफोन एक उत्तम पर्याय ठरणार आहे. स्मार्टफोनवरील या ऑफर्स मर्यादेत कालावधीसाठी उपलब्ध असू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे.