अरे चाललंय तरी काय? गुगल मॅपने पुन्हा दाखवला चुकीचा रस्ता, गोव्याला जाणारं कुटूंब जंगलात अडकलं
लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप गुगल मॅपमुळे पुन्हा एक घटना घडली आहे. गुगल मॅपवर दाखवलेल्या रस्त्यानुसार बिहारवरून एक कुटूंब गोव्याला जात होते. मात्र त्यांनी गुगल मॅपवर दाखवल्या प्रमाणे शॉटकर्ट घेतला आणि त्यांची गाडी जंगलात अडकली. या कुटूंबियांनी जगंलातून बाहेर येण्यासाठी पोलिसांना फोन केला. व त्यानंतर पोलिसांनी कुटुंबाची जंगलातून सुखरूप सुटका केली.
Google Map Update: गुगल मॅप ठरतोय अपघाताचं कारण? सुरक्षित प्रवासासाठी लक्षात ठेवा या टीप्स
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारहून गोव्याला जाणारे एक कुटुंब गुगल मॅपवर अवलंबून राहून प्रवास करत होते. यावेळी त्यांना कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील भीमगढ जंगलात शॉर्टकटच्या सूचना मिळाल्या. त्यामुळे गुगल मॅपवर दाखवल्या गेलेल्या मार्गाप्रमाणे चालकाने गाडी वळवली. मात्र हा शॉटकर्ट त्यांना थेट जंगलात घेऊन गेला. शिरोली आणि हेमडगा परिसरातील या अवघड मार्गावर गुगल मॅपने त्यांना सुमारे 8 किलोमीटर आत नेऊन अडचणीत आणले. यावेळी घनदाट जंगल परिसर आणि खराब रस्ते हे कुटुंबासाठी आव्हान बनले होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
घनदाट जंगलात मोबाईल नेटवर्क गायब असल्याने कुटुंबीय कोणाशीही संपर्क करू शकत नव्हते. यानंतर, जंगलातील शांतता आणि अज्ञात धोक्यांनी वेढलेल्या कुटुंबाला त्यांच्या कारमध्ये रात्र काढावी लागली. रात्री जंगलातून बाहेर येण्यासाठी कोणताही मार्ग सापडत नसल्याने त्यांना सकाळची वाट पहावी लागली.
सकाळ होताच कुटुंबीय नटवर्कच्या शोधात गेले. यानंतर गाडी अडकलेल्या ठिकाणापासून त्यांना 4 किलोमीटर अंतरावर मोबाईल नेटवर्क सापडलं. त्यानंतर कुटूबियांनी तात्काळ आपत्कालीन हेल्पलाइन 112 वर संपर्क साधला. स्थानिक पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत कुटुंबाला जंगलातून सुखरूप बाहेर काढले.
गुगल मॅपच्या चुकीने लोकांना अडचणीत टाकण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या महिन्याच्या शेवटी आणि या महिन्याच्या सुरुवातीला गुगल मॅपमुळे अपघाताच्या दोन घटना घडल्या होत्या. एका घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता तर एका घटनेत तिघेजण जखमी झाले होते. या घटनांची चौकशी सुरु करण्यात आली असून गुगल मॅपवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तिघे मित्र त्यांच्या गाडीमधून लग्नासाठी जात होते. त्यांनी रस्त्याच्या मार्गदर्शनासाठी गुगल मॅपची मदत घेतली होती. यावेळी गुगल मॅपने पुलावरून जाण्याचा रस्ता दाखवला. मात्र हा पुल तुटलेला होता. पुलावर गाडी नेताच गाडी नदीत पडली आणि गाडीमधील तिघांचा मृत्यू झाला.
मोबाईल फोनमध्ये गुगल मॅप वापरून गाडीमधील तिघेजण पिलीभीतला जात होते. बरेलीच्या बडा बायपासला येताच गुगल मॅपवर त्यांना शॉटकर्ट दिसला. या शॉटकर्ट रस्त्यावर गाडी नेताच त्यांची गाडी कालव्यात पडली. या अपघातात गाडीमधील तिघेजण जखमी झाले.