Smartphone under 10k: अफोर्डेबल किंमतीत उपलब्ध आहेत हे बेस्ट 5G स्मार्टफोन्स, तुमच्यासाठी कोणता सर्वोत्तम?
कमी बजेटमध्ये आणि सर्वोत्तम फीचर्ससह फोन खेरदी करणं खूप मोठं आव्हान आहे. कमी बजेटमध्ये तुमच्या गरजेनुसार स्मार्टफोन खरेदी करताना प्रचंड गोंधळ निर्माण होतो. बाजारात कमी किमतीत अनेक फोन उपलब्ध आहेत, यामध्ये काही शंकाच नाही. परंतु जेव्हा आपण स्वत: साठी फोन निवडतो तेव्हा कोणता फोन खरेदी करावा हे समजत नाही. जर तुम्हाला रोजच्या वापरासाठी 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत चांगला फोन घ्यायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
हेदेखील वाचा- Oppo Find X8 Mini स्मार्टफोन लाँचिंगची तयारी सुरु, 100W चार्जिंग सपोर्टसह करणार एंट्री
आता आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या काही बेस्ट 5G स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. ज्यांची किंमत 10 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे. शिवाय यामध्ये अनेक फीचर्स देखील उपबल्ध आहेत, जे तुम्हाला तुमच्या रोजच्या कामासाठी उपयुक्त ठरणार आहेत. हे स्मार्टफोन्स किमतीच्या बाबतीत चांगले फीचर्स देतात. (फोटो सौजन्य – X)
तुम्हाला परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. Realme, Samsung आणि Motorola सह अनेक कंपन्या 10,000 रुपयांच्या रेंजमध्ये बेस्ट स्मार्टफोन ऑफर करतात. हे स्मार्टफोन्स किमतीसाठी चांगली वैशिष्ट्ये देतात. तुम्ही हे स्मार्टफोन्स Amazon आणि Flipkart वरून खरेदी करू शकता. चला या फोन्सबद्दल जाणून घेऊया.
Samsung Galaxy A14 5G हा फोन 6.6 इंच PLS LCD, 90Hz डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. परफॉर्मन्ससाठी त्यात MediaTek डायमेंशन 700 प्रोसेसर बसवण्यात आला आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीच्या पुढील बाजूस 13MP सेंसर आहे. फोनमध्ये 15W चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. Samsung Galaxy A14 5G स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आहे.
Motorola G45 हा फोन फ्लिपकार्टवर 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी आणि 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 6.5 इंच स्क्रीन आहे जी 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोन 16MP सेल्फी सेन्सरसह ऑफर करण्यात आला आहे. तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Motorola G45 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
अफोर्डेबल किंमतीत उपलब्ध असलेल्या Poco सेगमेंटमध्ये Poco M6 5G स्मार्टफोन ऑफर केला जात आहे. यात 90 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.74 इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5MP सेंसर आहे. हा स्मार्टफोन 7,999 रुपयांच्या किंमतीत ऑफर केला जात आहे.
हेदेखील वाचा- चोरुन वाचले जात आहेत तुमचे WhatsApp चॅट्स? तुमची नकळत केलेली चूकसुद्धा महागत पडेल
Realme च्या Narzo सीरीजमध्ये येणारा हा फोन Amazon वर 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत म्हणजेच 8,499 रुपयांना उपलब्ध आहे. यात 90 Hz रिफ्रेश रेटसह 6.75 इंच डिस्प्ले आहे आणि फोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यात 8MP सेल्फी कॅमेरा आणि 50MP प्राथमिक कॅमेरा आहे.
Itel Color Pro 5G या स्मार्टफोनमध्ये 50MP रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे. सेल्फीसाठी 8MP चा सेन्सर आहे. यात 6.6-इंचाचा डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तुम्ही Amazon वरून हा फोन 9,490 रुपयांना खरेदी करू शकता.