चोरुन वाचले जात आहेत तुमचे WhatsApp चॅट्स? तुमची नकळत केलेली चूकसुद्धा महागत पडेल
व्हॉट्सॲप जगभरातील लाखो लोक वापरतात. व्हिडिओ आणि फोटो पाठवण्याव्यतिरिक्त, WhatsApp वैयक्तिक चॅट्ससाठी देखील वापरला जातो. या चॅट्सची सुरक्षा आणि प्रायव्हसी खूप महत्वाची आहे, ही सुरक्षा आपल्याच हातात असते. व्हॉट्सॲपने एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असल्याचा दावा केला असला तरी, तरीही आपली सुरक्षा मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला अनेक महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
हेदेखील वाचा-WhatsApp Tricks: या आहेत WhatsApp च्या काही जबरदस्त ट्रीक्स, चॅट्स करताना ठरतील फायदेशीर
जर एखाद्याने त्याच्या डिव्हाइसवर आपलं व्हॉट्सॲप लॉग इन केले तर आपल्या सर्व वैयक्तिक चॅट लीक होऊ शकतात, कोणीही तुमचे चॅट वाचू शकतो. तुमचे व्हॉट्सॲप दुसऱ्याच्या फोनमध्ये लॉग इन झाले आहे की नाही हे तुम्हाला तपासायचे असेल, तर आम्ही तुम्हाला ते तपासण्याची पद्धत सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
आजच्या डिजिटल युगात आपली वैयक्तिक माहिती हॅकर्सपासून सुरक्षित ठेवणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे अशा काही चुका आहेत ज्या चुकूनही करू नयेत. अनेकदा असे घडते की आपण कोणालातरी फोन देतो आणि तो व्यक्ति त्याच्या फोनवर व्हॉट्सॲप लॉग इन करतो. यानंतर, तुमचे सर्व वैयक्तिक चॅट त्याला देखील दिसू लागतात. तुमची स्वतःची माणसंही हे अनेक वेळा करू शकतात. त्यामुळे फोन कोणाच्या हाती देण्यापूर्वी आणि नंतर काही गोष्टी काळजीपूर्वक कराव्यात.
हेदेखील वाचा-WhatsApp चॅटची थीम बदला किंवा लो लाईटमध्ये व्हिडीओ कॉल करा, प्रत्येक काम होणार मजेदार!
तुमचे व्हॉट्सॲप दुसऱ्याच्या डिव्हाइसवर लॉग इन झाले आहे का? हे तपासण्यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सॲप ओपन करा आणि तीन डॉट्सवर क्लिक करा. यानंतर लिंक्ड डिव्हाइसवर टॅप करा. येथे तुम्हाला त्या सर्व डिव्हाईसची यादी दिसेल. ज्यामध्ये तुमचे व्हॉट्सॲप लॉग इन आहे. तुमचे अकाउंट चुकीच्या ठिकाणी लॉग इन झाले आहे असे वाटत असल्यास, ते काढून टाकण्यासाठी तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल आणि लॉग आउट करावे लागेल.