Tech Tips: तुमच्या नव्या Washing Machine ला खटारा बनवतील या चूका, वेळीच टाळा नाहीतर होईल मोठं नुकसान
नवीन वॉशिंग मशीन खरेदी करण्याचा विचार करताय? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नवीन वॉशिंग मशीन जर काहीच दिवसांत खराब होत असेल, तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या रोजच्या सवयी तुमची वॉशिंग मशीन खराब करत आहे. तुम्ही तर अशा काही चुका करत नाही ना ज्यामुळे वॉशिंग मशीनला नुकसान पोहोचतं? आता आम्ही तुम्हाला अशा 5 चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या रोजच्या जीवनात केल्या जातात, ज्यामुळे वॉशिंग मशीन खराब होते.
तयार आहात ना! लवकरच सुरु होतोय BSNL चा फ्लॅश सेल, फ्री डेटा आणि डिस्काऊंट मिळण्याची शक्यता
सर्वात सामान्य चूक म्हणजे मशीनमध्ये जास्त कपडे टाकणं. ओवरलोडिंगमुळे मोटार आणि ड्रमवर अतिरिक्त दबाव पडतो. ज्यामुळे स्पिनिंगदरम्यान असंतुलन निर्माण होऊ शकते आणि मशीनला दिर्घकाळासाठी नुकसान पोहोचू शकते. यामुळे कपडे व्यवस्थित स्वच्छ होत नाही आणि डिटर्जेंटचे डाग राहतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेक लोकांना असं वाटतं की, जास्त डिटर्जेंटचा वापर केल्याने कपडे चांगले स्वच्छ होतात. पण असं नाही आहे. जास्त डिटर्जेंटचा वापर केल्याने जास्त फेस निर्माण होतो आणि मशीन पूर्णपणे कपडे धुवू शकत नाही. यामुळे ड्रम आणि पाईपमध्ये अवशेष जमा होतात, ज्यामुळे बुरशी, वास येतो आणि कार्यक्षमता कमी होते. नेहमी मशीनचा टाइप (टॉप-लोड किंवा फ्रंट-लोड) नुसार वापर करा.
वॉशिंग मशीन कपडे स्वच्छ करत असली तरी तिला देखील स्वच्छतेची आवश्यकता असते. लोकं अनेकदा डिटर्जेंट ट्रे, लिंट फिल्टर आणि ड्रमच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत. मशीनमध्ये घाण, लिंट आणि डिटर्जंटचे कण जमा होतात, ज्यामुळे परफॉर्मेंसवर परिणाम होतो आणि मेकॅनिकल समस्या देखील निर्माण होतात. दर महिन्याला ड्रम क्लीन सायकल किंवा व्हिनेगर-बेकिंग सोड्याने मशीन स्वच्छ करा.
वॉशिंग मशीन नेहमी प्लॅट, स्थिर पृष्ठभागावर ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जर त्या स्थिर पृष्ठभागावर नसतील तर फिरताना जास्त वाइब्रेशन होते, ज्यामुळे अंतर्गत भागांमध्ये झीज होते. असंतुलित मशीन जास्त आवाज करतात. मशीनचे पाय अशा प्रकारे एडजस्ट करा की ते स्थिर असेल.
असे अनेक युजर्स आहेत जे असामान्य आवाज, पाण्याची गळती किंवा असंतुलित भार यासारख्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण यामुळे मशीनला गंभीर नुकसान होऊ शकते. या किरकोळ समस्या, जर लवकर दुरुस्त केल्या नाहीत तर कालांतराने मशीन खराब होऊ शकते. तुम्ही देखील अशा चूकांकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमची मशीन देखील कालांतराने खराब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळीच मशीनची योग्य काळजी घ्या आणि चुका टाळा.