
tech (फोटो सौजन्य: social media)
अमेझॉनचे दोन नवीन स्मार्ट डिस्प्ले लाँच! तापमान ओळखण्यासाठी पडेल उपयोगी, जाणून घ्या वैशिष्ट्ये
मूळ किंमत ₹4,000, मात्र एअरटेल ग्राहकांसाठी मोफत
एअरटेल आणि अडोबी यांच्यात पहिल्यांदाच हा ऐतिहासिक करार झाला आहे. या भागीदारीअंतर्गत एअरटेलचे सर्व ग्राहक Adobe Express Premium चे वर्षभर मोफत सबस्क्रिप्शन वापरू शकणार आहेत. या अॅपच्या सबस्क्रिप्शनची मूळ किंमत सुमारे ₹4,000 आहे.
डिझायनिंगचा कोणताही अनुभव नसलेले ग्राहकही या अॅपच्या मदतीने व्यावसायिक दर्जाचे पोस्ट, मार्केटिंग मटेरियल, छोटे व्हिडिओ आणि डिझाइन्स सहज तयार करू शकतात.
Airtel Thanks अॅपवरून सहज अॅक्टिव्हेशन
ही सुविधा मोबाईल, वाय-फाय आणि डीटीएच सेवा वापरणाऱ्या सर्व एअरटेल ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. यासाठी ग्राहकांना फक्त Airtel Thanks अॅपवर लॉग-इन करावे लागेल. विशेष म्हणजे, हे सबस्क्रिप्शन सुरू करण्यासाठी क्रेडिट कार्डची आवश्यकता नाही.
कोणकोणत्या सुविधा मिळणार?
Adobe Express Premium मध्ये हजारो प्रोफेशनल डिझाइन टेम्पलेट्स उपलब्ध आहेत. ही टेम्पलेट्स भारतीय सण-उत्सव, लग्न समारंभ आणि स्थानिक व्यवसायांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत.
यामध्ये
Adobe Express आता इंग्रजीसह हिंदी, तामिळ आणि बंगाली भाषांमध्येही उपलब्ध आहे. त्यामुळे शुभेच्छापत्रे, लग्नपत्रिका, स्थानिक जाहिराती किंवा WhatsApp स्टेटससारखा कंटेंट सामान्य वापरकर्ताही सहज तयार करू शकतो.
काय फायदे होणार?
या भागीदारीमुळे एअरटेल ग्राहकांना जनरेटिव्ह AI तंत्रज्ञानाचा थेट लाभ मिळणार आहे. यामुळे कामाचा वेग वाढेल, दर्जा सुधारेल आणि डिजिटल जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे अधिक सोपे होईल.
आता क्रोम स्वतः करणार ब्राउजिंग! Gemini AI मुळे ट्रिप प्लॅनपासून ईमेलपर्यंत सगळं ऑटो
Ans: मोबाईल, वाय-फाय आणि डीटीएच सेवा वापरणाऱ्या सर्व एअरटेल ग्राहकांना.
Ans: सुमारे ₹4,000 रुपये प्रति वर्ष.
Ans: इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि बंगाली भाषांमध्ये.