तयार आहात ना! लवकरच सुरु होतोय BSNL चा फ्लॅश सेल, फ्री डेटा आणि डिस्काऊंट मिळण्याची शक्यता
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी लवकरच भारतात फ्लॅश सेलचे आयोजन करण्याचा विचार करत आहे. टेलीकॉम ऑपरेटर BSNL ने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने पोस्टमध्ये युजर्सना काही प्रश्न देखील विचारले आहेत.
कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत सेलची घोषणा केली आहे आणि अपकमिंग डील्सबाबत देखील माहिती दिली आहे. फ्लॅश सेलमध्ये कंज्यूमर्सना फ्री डेटा, ब्रॉडबँड डील्स किंवा डिस्काउंट्स ऑफर केलं जाण्याची शक्यता आहे. हे BSNL ची भारतात 5G सर्विस आणि प्रीपेड आणि पोस्टपेड SIM कार्ड्सची डोरस्टेप डिलीवरी सुरु झाल्यानंतर या सेलची घोषणा करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये BSNL ने भारतातील फ्लॅश सेलबाबत घोषणा केली आहे. यासोबतच व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं आहे की, ‘काहीतरी मोठे घडणार आहे! तुम्ही अनपेक्षित अनुभवासाठी तयार आहात का?’ हा प्लॅश सेल कधी सुरु होणार आहे, किती दिवस असणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती शेअर केली नाही. सेलची पोस्ट शेअर करताना केवळ कमिंग सून लिहीलं आहे. याशिवाय कंपनीने सोशल मीडिया युजर्सना सेलमध्ये काय खास असणार आहे, याबाबत अंदाज वर्तवण्यास सांगितलं आहे. टीझरनुसार, बीएसएनएल ग्राहकांना मोफत डेटा, ब्रॉडबँड डील किंवा मोठी सूट मिळू शकते.
FLASH SALE ALERT!
The BSNL FLASH SALE is almost here and it comes with a mystery twist!
We’re giving YOU the chance to guess what’s coming:
FREE Data?
A. Superfast Broadband Deals?
B. Massive Discounts?
Comment your guess now!
Stay Tuned.#BSNL #BSNLSale #FlashSale… pic.twitter.com/FpMAHdfY0O
— BSNL India (@BSNLCorporate) June 26, 2025
प्लॅश सेल अशावेळी सुरु केला जात आहे जेव्हा भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील ग्राहकांची संख्या कमी होत आहे. टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) द्वारे शेअर करण्यात आलेल्या टेलीकॉम सब्सक्रिप्शन डेटाद्वारे अशी माहिती आहे की, एप्रिलमध्ये एकूण 0.2 मिलियन ग्राहकांची घट झाली आहे. शिवाय, डेटावरून असेही दिसून येते की बीएसएनएलने त्याच कालावधीत 1.8 दशलक्ष सक्रिय ग्राहक गमावले आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी कंपनी सेलची योजना आखत असल्याची शक्यता आहे.
गमावलेले ग्राहक पुन्हा मिळवण्यासाठी आणि नवीन ग्राहक जोडण्यासाठी कंपनीने तायरी सुरु केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीने भारतात 5G सर्विसची घोषणा केली होती. या सर्विसला Q-5G (Quantum 5Gहे नाव ) असं नाव देण्यात आलं आहे. हे नाव बीएसएनएलच्या 5G नेटवर्कची ‘शक्ती, वेग आणि भविष्य’ प्रतिबिंबित करते असे म्हटले जाते. याशिवाय कंपनीने प्रीपेड आणि पोस्टपेड SIM कार्ड्सची डोरस्टेप डिलीवरी देखील सुरु केली आहे.
ही नवीन सर्विस सुरु केल्यामुळे गमावलेले ग्राहक पुन्हा मिळवण्यासाठी आणि नवीन ग्राहक जोडण्याची संधी आहे. याशिवाय ग्राहकांना त्यांचा नंबर BSNL मध्ये पोर्ट करण्याची संधी देखील उपलब्ध आहे. हे सिम घरी डिलीव्हर केलं जाणार आहे. यासाठी ग्राहकांना केवळ सेल्फ-केवायसीसाठी ग्राहक नोंदणी फॉर्म भरावा लागेल, त्यानंतर सिम डिलिव्हर केला जाईल.