Tech Tips: WhatsApp वरील स्पॅम कॉल्समुळे हैराण झालात? लगेच अॅपमध्ये करा ही महत्त्वाची सेटिंग
स्पॅम कॉल्सची समस्या प्रचंड वाढली आहे. नॉर्मल कॉल्ससोबतच आता व्हॉट्सॲपवर देखील स्पॅम कॉल्स केले जात आहेत. आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटूंबियासोबत बोलण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आता सायबर गुन्हेगार लोकांना टार्गेट करण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर करत आहेत. सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी व्हॉट्सॲप कॉल करतात. अनेक लोक असे आहेत की, सायबर गुन्हेगारांच्या या कॉल्सला बळी पडतात.
आपल्या फोनमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे आपण स्पॅम कॉल्स अगदी सहज ओळखू शकतो आणि असे कॉल्स टाळू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, व्हॉट्सॲपमध्ये देखील असं एक फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज स्पॅम कॉल्स टाळू शकता. याच फीचरबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी सतत नवीन फीचर्स रोलआऊट करत आहे. कंपनी 2 नवीन फीचर्स आणत आहे. एका फीचरमध्ये यूजर्स रेग्युलर चॅटमध्ये इव्हेंट्स तयार करू शकतील आणि दुसऱ्या फीचरमध्ये यूजर्स पोल ऑप्शनमध्ये फोटो पोस्ट करू शकतील. दोन्ही फीचर्स युजर्सच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी मदत करणार आहेत. सध्या कंपनी यावर काम करत आहे आणि आगामी अपडेट्समध्ये ते वापरकर्त्यांसाठी रोलआऊट केले जाईल.
आतापर्यंत व्हॉट्सॲप ग्रुप चॅट्स आणि कम्युनिटी ग्रुप्समध्ये ही सुविधा देत होते. आता नियमित चॅटमध्येही त्याचा समावेश केला जात आहे. नवीन फीचर आल्यानंतर युजर्सना गॅलरी, कॅमेरा आणि लोकेशन इत्यादीसह इव्हेंटचा पर्यायही दिसेल. त्यावर टॅप केल्यानंतर, तुम्हाला इव्हेंटचे नाव द्यावे लागेल आणि त्याची तारीख निवडावी लागेल. जर वापरकर्त्याला हवे असेल तर तो उर्वरित माहिती देखील देऊ शकतो. कार्यक्रमाची समाप्ती वेळ देखील या वैशिष्ट्यामध्ये लिहिली जाऊ शकते. जेणेकरुन समोरच्या युजर्सना इव्हेंट किती दिवस चालेल हे कळू शकेल.
नियमित चॅटमधील कार्यक्रमांसोबतच व्हॉट्सॲप पोलमध्ये फोटो जोडण्याच्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर लाँच केल्यानंतर चॅनल ओनरना प्रत्येक पोल ऑप्शनसोबत फोटो जोडण्याचा पर्याय मिळेल. प्रत्येक पोलमधील वोटर्सना प्रत्येक पोल ऑप्शनचे विजुअल रिप्रजेंटेशन असेल. त्यामुळे त्यांना वोट करण्यापूर्वी पर्याय सहज समजून घेण्याची संधी मिळणार आहे. केवळ मजकूराद्वारे काहीतरी स्पष्ट करणे कठीण आहे अशा परिस्थितीत पोलमध्ये फोटो टाकण्याचा पर्याय अधिक प्रभावी असू शकतो. हे विशेषतः डिझाइन, प्रवास आणि खाद्य इत्यादी विषयांवर आधारित चॅनेलच्या अनेक समस्या कमी करेल.