UPI युजर्सना टार्गेट करतोय 'Jumped Deposit Scam'; बॅलन्स चेक करताच रिकामं होईल बँक अकाऊंट
स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती शोधत आहेत. कधी डिजीटल अरेस्ट तर कधी बनावट QR कोड, कधी बनवाट शॉपिंग वेबसाईट. ऑनलाइन फसवणुकीच्या रोज अनेक घटना समोर येत आहेत, ज्यामध्ये स्कॅमर्स नवीन पद्धतींचा वापर करून फ्रॉड करत आहेत. अनेकवेळा लोकांना कळत देखील नाही की त्यांची फसवणूक झाली आहे आणि जेव्हा लोक याबाबत तक्रार करण्यासाठी जातात तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
स्कॅमर्स आणि हॅकर्स त्यांच्या प्रत्येक स्कॅममध्ये एका विशिष्ट वर्गाला टार्गेट करतात. आता स्कॅमर्सच्या टार्गेटवर आहेत, यूपीआय युजर्स. आपण एखादं ऑनलाईन ट्रांझेक्शन केलं की लगेच आपल्या बँक अकाऊंटमध्ये किती बॅलन्स आहे हे चेक करतो. पण सध्या सुरु असलेल्या स्कॅममध्ये तुम्ही तुमच्या यूपीआय अकाऊंटमध्ये बँक बॅलन्स चेक करण्यासाठी पीन टाकताच, तुमचं अकाऊंट रिकामं होऊ शकतं. सायबर स्कॅमचा हा नवीन प्रकार जम्पड डिपॉझिट स्कॅम, या नावाने ओळखला जातो. (फोटो सौजन्य – pinterest)
जम्पड डिपॉझिट स्कॅममध्ये विशेषतः UPI वापरकर्त्यांना टार्गेट केले जात आहे आणि त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न स्कॅमर्सकडून केला जात आहे. या घोटाळ्यात लोकांची फसवणूक करण्यासाठी प्रथम त्यांच्या अकाऊटमध्ये छोटी रक्कम जमा केली जाते. लोकांना असे वाटते की त्यांना काही बक्षीस मिळाले आहे. मग लोक त्यांच्या बँक अकाऊंटचा बॅलन्स चेक करण्यासाठी पीन टाकतात आणि पीन टाकताच त्याचं बँक अकाऊंट रिकामं होतं. येथेच स्कॅमर्स लोकांची फसवणूक करून त्यांच्या अकाऊंटमधून पैसे काढतात.
सर्वप्रथम युजरच्या अकाऊंटमध्ये छोटी रक्कम जमा केली जाते. सहसा ही रक्कम 1,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान असते. हे पैसे पाहून लोक उत्साहित होतात आणि हे पैसे कुठून आले हे जाणून घेण्यासाठी त्यांचे बँकिंग ॲप उघडतात. पण, इथे एक ट्विस्ट आहे. तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवण्यासोबतच स्कॅमर्स तुम्हाला विदड्रॉल रिक्वेस्ट देखील पाठवतात, ज्याची रक्कम खूप जास्त असते. जेव्हा लोक त्यांचा पिन टाकून बँक अकाऊंटचा बॅलन्स चेक करतात, तेव्हा युजर नकळत स्कॅमर्सनी पाठवलेली पैसे काढण्याची विनंती स्विकारतो.
स्कॅमर याचा फायदा घेतात आणि तुम्हाला काही कळण्यापूर्वी तुमचे बँक अकाऊंट रिकामे केले जाते. म्हणजे स्कॅमर तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे काढून घेतात. हा घोटाळा शोधणे कठीण आहे कारण लोकांना वाटते की ते फक्त त्यांचा बँक बॅलन्स तपासत आहेत. अशावेळी, तुम्ही काही मार्गांनी घोटाळ्याबद्दल जाणून घेऊ शकता.
9 जानेवारीला लाँच होणार हा स्मार्टफोन, 6 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 12GB रॅमचा सपोर्ट