ऑनलाइन शॉपिंग दरम्यान वाढतोय ब्रशिंग स्कॅमचा धोका! स्कॅमर्सच्या जाळ्यातून वाचण्यासाठी या टीप्स फॉलो करा
ऑनलाईन शॉपिंग प्रत्येकाला आवडते. कारण यामध्ये वेळेची आणि पैशांची बचत होते. ऑनलाईन शॉपिंग करताना आपल्याला बाजारात जाऊन अनेक दुकानं फिरावी लागत नाहीत, किंवा वस्तूंच्या वाढीव दरासाठी दुकानदारासोबत भावतोल करावा लागत नाही. ऑफर्स आणि डिस्काऊंटसह अगदी कमी किंमतीत आपण ऑनलाईन शॉपिंग दरम्यान खरेदी करू शकतो. ऑफर्स आणि डिस्काऊंटमुळे आपले पैसे तर वाचतात. पण ऑनलाईन शॉपिंगवेळी सर्वात मोठा धोका म्हणजे स्कॅम आणि फ्रॉडचा.
9 जानेवारीला लाँच होणार हा स्मार्टफोन, 6 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 12GB रॅमचा सपोर्ट
स्कॅमर्स बनावट वेबसाईट किंवा खोट्या ऑफर्स देऊन ऑनलाईन शॉपिंग दरम्यान आपली फसवूणक करू शकतात, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. पण सध्या ऑनलाईन शॉपिंग दरम्यान आणखी एक नवा स्कॅम आला आहे, हा स्कॅम आहे ब्रशिंग स्कॅम. ई-कॉमर्स साइटवरून काहीतरी खरेदी करायचे की नाही हे ठरवण्यासाठी आपल्यापैकी बरेचजण प्रोडक्टचे रिव्ह्यु आणि रेटिंगवर अवलंबून असतात. याचाच फायदा घेऊन स्कॅमर्स ग्राहकांची फसवूणक करतात. अहवालानुसार, स्कॅमर आता रिव्ह्यु हँडल करत आहेत. म्हणजेच स्कॅमर्स बनावट पद्धतीने रिव्ह्यु तयार करून एखादे लो क्वालिटी प्रोडक्ट लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून बनावट विक्री निर्माण होऊ शकेल. फसवणुकीच्या या नव्या पद्धतीला ‘ब्रशिंग स्कॅम’ म्हटले जात आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
ब्रशिंग स्कॅममध्ये स्कॅमर लोकांना बनावट प्रोडक्ट पाठवतात आणि यानंतर ग्राहकांच्या नावाने ऑनलाइन रिव्ह्यु पोस्ट करतात. ‘ब्रशिंग’ हा शब्द चिनी ई-कॉमर्स प्रॅक्टिसमधून आला आहे जेथे विक्रेते बनावट ऑर्डर आणि रिव्ह्यु तयार करून त्यांच्या प्रोडक्टचे रेटिंग वाढवतात. या स्कॅममध्ये, विक्रेते ई-कॉमर्स साइट्सच्या रँडम युजर्सना गरजेचे नसलेले पॅकेज पाठवतात. या पॅकेजमध्ये सहसा स्वस्त, कमी दर्जाच्या वस्तू असतात जसे की कॉस्टयूम ज्वेलरी, लहान गॅझेट्स किंवा इत्यादी. एकदा पॅकेज डिलीवर झाल्यानंतर, स्कॅमर Amazon आणि AliExpress सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रोडक्टची विजिबिलिटी आणि बनावट लोकप्रियता वाढवण्यासाठी प्रोडक्ट पेजवर रिसीवरचे नाव वापरून 5 स्टार रिव्यूज लिहितात.
मॅकॅफीच्या अहवालानुसार, या घोटाळ्याचा उद्देश विक्रीच्या आकड्यांमध्ये फेरफार करणे आणि ई-कॉमर्स साइट्सवरील प्रोडक्ट्सच्या क्वालिटी आणि विजिबिलिटीमध्ये भ्रम निर्माण करणे हा आहे. जे ग्राहक रिव्ह्यु पाहून ऑनलाईन शॉपिंग करतात, अशा ग्राहकांची येथे फसवणूक केली जाते. वास्तविक, या घोटाळ्याद्वारे, स्कॅमर तुमच्या संवेदनशील डेटाचा फायदा घेत आहेत आणि तुम्ही सावध न राहिल्यास तुम्ही तुमचे पैसेही गमावू शकता.
स्कॅमर अज्ञात ई-कॉमर्स वापरकर्त्यांची नावे आणि पत्ते वापरून गरज नसलेले पार्सल पाठवून प्रोडक्ट्स लोकप्रिय करत आहेत. असे पॅकेज प्राप्त करणे हे सूचित करू शकते की तुमच्या वैयक्तिक माहितीशी तडजोड केली गेली आहे, ज्यामुळे ओळख चोरी आणि इतर गोपनीयतेचे उल्लंघन यासारखे महत्त्वपूर्ण धोके निर्माण होतात.
गेमिंग स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
आइडेंटिटी थेफ्ट आणि मीसलिडिंग रिव्यूज व्यतिरिक्त, एका अहवालात असे दिसून आले आहे की अनेक अवांछित पॅकेजेमध्ये आता QR कोड समाविष्ट आहेत जे प्राप्तकर्त्याला ते स्कॅन करण्यास प्रोत्साहित करतात. स्कॅमर आकर्षक संदेश वापरतात. जसे- ‘रिव्ह्यू लिहिण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा आणि 500 रुपयांचं गिफ्ट कार्ड जिंका.’ हे QR कोड स्कॅन केल्याने तुमचा डेटा स्कॅमर्सपर्यंत अगदी सहज पोहोचू शकतो. पॅकेजमध्ये असलेले QR कोड तुमची संवेदनशील माहिती चोरण्यासाठी किंवा तुमच्या डिव्हाइसवर मालवेअर इंस्टॉल करण्यासाठी डिझाईन केलेले असतात. चोरीला गेलेला वैयक्तिक डेटा नंतर आर्थिक फसवणूक किंवा फिशिंग हल्ल्यांसाठी वापरला जाऊ शकतो.