9 जानेवारीला लाँच होणार हा स्मार्टफोन, 6 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार 12GB रॅमचा सपोर्ट
स्मार्टफोन कंपनी itel गेल्या काही दिवसांपासून आपल्या नवीन स्मार्टफोनचे टीझर शेअर करत आहे. आता कंपनीने हा नवीन स्मार्टफोन कधी लाँच होणार याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत नवीन स्मार्टफोनची लाँच डेट शेअर केली आहे. कंपनीने माहिती दिली आहे की नवीनतम स्मार्टफोन itel Zeno 10 भारतात 9 जानेवारीला लाँच होणार आहे.
आगामी स्मार्टफोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनच्या माध्यमातून देशात विकला जाणार आहे. कंपनीने या फोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सचीही माहिती दिली आहे. फोनचा लूक यूजर्सना विशेष आकर्षित करण्याची शक्यता आहे. कारण हा नवीन स्मार्टफोन एका हटके आणि वेगळ्या लूकसह भारतात लाँच केला जाणार आहे. नवीन वर्षातील हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
नवीनतम स्मार्टफोन itel Zeno 10 लाँचच्या दिवशी विक्रीसाठी जाईल आणि दुपारी 12 वाजल्यापासून देशात उपलब्ध होईल. डिव्हाइसची किंमत 6,000 रुपयांपेक्षा कमी असल्याची पुष्टी झाली आहे. त्यामुळे 6000 रुपयांच्या किमतीत युजर्सना एक हटके लुकसह स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.
डिस्प्ले – itel म्हणते की नवीनतम itel Zeno 10 डिव्हाइसमध्ये HD+ रिझोल्यूशन आणि डायनॅमिक बारसह 6.6-इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
The ultimate Zeno 10 smartphone is coming soon.
Stay tuned!#ZENO #zeno10 #zenosmartphone #upcoming #itel https://t.co/M0AAIRsFEn pic.twitter.com/EGCaAZi66S
— itel India (@itel_india) January 4, 2025
रॅम आणि स्टोरेज – Zeno 10 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे. स्मार्टफोन मेमरी फ्यूजन तंत्रज्ञानाला देखील समर्थन देईल जे 8GB पर्यंत रॅम वाढवू शकते. ज्यामुळे युजर्सना केवळ 6000 रुपयांच्या किमतीत 12 GB रॅमचा सपोर्ट मिळणार आहे. हे डिव्हाईस मिस्टिक वेव्ह पॅटर्नसह दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल.
Step into the Zeno universe and experience the ultimate collision of speed, style and power.
The Ultimate Zeno 10.
Coming soon.#zeno #zenoseries #zeno10 #itel #zenosmartphone #ComingSoon pic.twitter.com/kWpQF26nYs— itel India (@itel_india) December 31, 2024
बॅटरी – itel Zeno 10 स्मार्टफोनमध्ये एक मोठी 5,000mAh बॅटरी पॅक असू शकते जी कार्यक्षम चार्जिंगसाठी USB टाइप C पोर्ट वापरते.
कॅमेरा – स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर, स्मार्टफोनमध्ये 8MP AI ड्युअल रियर कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा असू शकतो. हे पोर्ट्रेट मोड, एचडीआर मोड, वाइड मोड, एआर शॉट, स्लो मोशन आणि बऱ्याच फिचर्सना सपोर्ट करेल.
Apple ची ती चूक पडली महागात, कंपनीला भरावा लागणार करोडोंचा दंड! युजर्सना मिळणार इकते पैसे
प्रोसेसर – MySmartPrice च्या रिपोर्टनुसार, हा डिवाइस Android 14 वर चालेल. Gen Z ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मार्टफोन एका आकर्षक स्टायलिश पॅकेजसह ऑफर केला जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे.