Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Refurbished Laptop खरेदी करण्याचा विचार करताय? या महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा, कधीही होणार नाही फसवणूक

रिफर्बिश्ड गॅजेट्स खरेदी करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आपण खरेदी असलेले रिफर्बिश्ड गॅजेट्स काही काळाने बंद पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी काही योग्य टीप्स लक्षात ठेवा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 19, 2025 | 11:03 AM
Refurbished Laptop खरेदी करण्याचा विचार करताय? या महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा, कधीही होणार नाही फसवणूक

Refurbished Laptop खरेदी करण्याचा विचार करताय? या महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवा, कधीही होणार नाही फसवणूक

Follow Us
Close
Follow Us:

सध्या लॅपटॉप ही काळाची गरज बनली आहे. आपण आपलं प्रत्येक काम स्मार्टफोनवर करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला लॅपटॉपच्या गरज असते. अगदी कॉलेज असाईंमेटपासून ऑफिसच्या कमापर्यंत सर्व कामांसाठी लॅपटॉप गरजेचा आहे. त्यामुळे आपल्याकडे देखील लॅपटॉप असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण लॅपटॉप आणि इतर गॅझेटच्या प्रचंड किमतीमुळे आज लोक रिफर्बिश्ड गॅजेट खरेदी करण पसंत करतात. कारण त्यांची किंमत काही प्रमाणात कमी असते.

Instagram आणि WhatsApp मध्ये होणार हे बदल, नवीन फीचर्समुळे युजर्सचा अनुभव होणार अधिक मजेदार

आजच्या काळात, भारतात असाही लोकांचा एक वर्ग आहे जो नवीन मोबाइल आणि लॅपटॉपऐवजी रिफर्बिश्ड गॅझेट खरेदी करत आहे. रिफर्बिश्ड गॅझेट सामान्यतः नवीन गॅझेटपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असतात, ज्यामुळे पैशांची बचत होते. पैसे वाचवण्यासाठी लोक रिफर्बिश्ड गॅझेट विकतही घेतात. पण काही काळानंतर ते गॅजेट्स नीट काम करत नाहीत आणि लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात घेऊन रिफर्बिश्ड गॅजेट्स खरेदी करा. या गोष्टींची काळजी घेतल्यास, तुम्हाला आणि तुमच्या डिव्हाइसला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. आणि तुम्ही खरेदी केलेले रिफर्बिश्ड गॅझेट देखील अगदी नव्या सारखी सुरू राहतील. (फोटो सौजन्य – pinterest)

रिफर्बिश्ड लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी वॉरंटी आणि रिटर्न पॉलिसी तपासा

जर तुम्ही रिफर्बिश्ड लॅपटॉप खरेदी करत असाल, तर अशावेळी तुम्ही त्याची वॉरंटी आणि रिटर्न पॉलिसी आधी तपासली पाहिजे. रिफर्बिश्ड लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला त्यावर किमान 6 महिन्यांची वॉरंटी मिळत असल्याची खात्री करा. दुसरीकडे, रिटर्न पॉलिसी देखील तपासा. जेणेकरून भविष्यात तुमच्या लॅपटॉपमध्ये कोणतीही समस्या उद्भवल्यास, तुम्ही तो परत करू शकता.

विश्वासू विक्रेत्याकडून खरेदी करा

नूतनीकृत लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही ज्या विक्रेत्याकडून किंवा कंपनीकडून तो खरेदी करत आहात त्याबद्दल योग्य माहिती मिळवा. तुम्ही विक्रेता किंवा कंपनीची पुनरावलोकने आणि रेटिंग देखील तपासू शकता. तुम्ही चांगल्या ठिकाणाहून खरेदी केल्यास तुम्हाला चांगल्या किमतीत आणि चांगल्या स्थितीत नूतनीकरण केलेला लॅपटॉप मिळू शकेल.

ग्रेडिंग आणि कंडीशन पहा

आम्ही तुम्हाला सांगतो की रिफर्बिश्ड केलेल्या लॅपटॉपची ग्रेडिंग (ग्रेड A, B, C) स्वरूपात असते. ए ग्रेड सर्वोत्तम आहे. तुम्ही ग्रेड ए ग्रेडिंग लॅपटॉप खरेदी केल्यास तुमचा लॅपटॉप चांगली कामगिरी करेल. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागणार नाही.

लॅपटॉप बॅटरी आयुष्य

इलेक्ट्रॉनिक गॅझेट खरेदी करताना, त्याच्या बॅटरीकडे सर्वात जास्त लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. रिफर्बिश्ड केलेल्या लॅपटॉपचे बॅटरी आयुष्य किती आहे? कमी बॅटरी लाइफ असलेला रिफर्बिश्ड लॅपटॉप खरेदी करू नका. कारण यामुळे तुमच्या कामांत अडथळे निर्माण होऊ शकतात, आणि तुम्हाला सतत तुमचा लॅपटॉप चार्ज करण्याकडे लक्ष द्यावे लागेल.

अनोळखी नंबर ब्लॉक करताय? फक्त फोनमध्ये करा ही सोपी सेटिंग, क्षणार्धात होईल या कॉल्सपासून सुटका

आवश्यक सॉफ्टवेअर इंस्टॉल करणे आवश्यक

रिफर्बिश्ड लॅपटॉप खरेदी करताना, त्यामध्ये असलेली ऑपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेअर काळजीपूर्वक तपासा. तुम्हाला एक्सटेंडेड वॉरंटी-अँटी-व्हायरस सबस्क्रिप्शनची वैशिष्ट्ये मिळत आहेत की नाही याची देखील खात्री करा. कारण कोणत्याही लॅपटॉपसाठी एक्सटेंडेड वॉरंटी-अँटी-व्हायरस सबस्क्रिप्शन फीचर फार महत्त्वाचे आहे.

Web Title: Tech tips use this important tips while buying refurbished laptop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 11:03 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.