Instagram आणि WhatsApp मध्ये होणार हे बदल, नवीन फीचर्समुळे युजर्सचा अनुभव होणार अधिक मजेदार
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स लाँच करत असतात. आता देखील कंपनी त्यांच्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप युजर्ससाठी लवकरच नवीन फीचर्ल रोलआऊट करणार आहे. या फीचरबद्दल जाणून घेऊया.
CES 2025: हे AI डिव्हाईस वाचणार तुमचं मन? ब्रेन कंप्यूटर इंटरफेस फीचरसह सुसज्ज, किंमत केवळ इतकी
व्हॉट्सॲप फीचरच्या माध्यमातून यूजर्स आता त्यांच्या स्टेटसमध्ये म्युझिक शेअर करू शकतील. यासाठी ड्रॉईंग एडिटरमध्ये नवीन म्युझिक बटण देण्यात आले आहे. यावर टॅप करून यूजर्स त्यांच्या आवडीची गाणी निवडू शकतील. व्हॉट्सॲप या फीचरवर बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे आणि आता ते बीटा यूजर्ससाठी आणले गेले आहे. हळूहळू हे फीचर सर्व युजर्ससाठी रोल आऊट केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
व्हॉट्सॲपच्या या फीचरमध्ये यूजर्स म्युझिक बटणावर क्लिक करून त्यांच्या स्टेटसच्या फोटो आणि व्हिडिओनुसार त्यांचे आवडते गाणे निवडू शकतील. येथे मेटाने तीच म्युझिक कॅटलॉग दिली आहे जे इंस्टाग्रामवर देखील उपलब्ध आहे. म्युझिक लायब्ररीमध्ये यूजर्सना इंस्टाग्रामप्रमाणे त्यांचे आवडते गाणे आणि आर्टिस्ट निवडण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, त्यांना ट्रेंडिंग ट्रॅक देखील दाखवले जातील, जे ते त्यांच्या स्टेटसमध्ये वापरण्यास सक्षम असतील.
एकदा म्यूझिक निवडल्यानंतर, वापरकर्त्यांना त्यांना त्यांच्या स्टेटसला गाण्याचा जो भाग ठेवायचा आहे तो निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. फोटो स्टेटसमध्ये, जास्तीत जास्त 15 सेकंदांची म्यूझिक क्लिप निवडली जाऊ शकते, तर व्हिडिओसाठी असे कोणतेही बंधन नाही. एकदा म्यूझिक क्लिप निवडल्यानंतर, ती स्टेटससह इंटीग्रेट केली जाईल. हे स्टेटस आकर्षक आणि एंटरटेनिंग बनविण्यात मदत करेल.
व्हॉट्सॲपवर येणारे हे फीचर इंस्टाग्रामवर आधीपासूनच लोकप्रिय आहे. इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करताना म्यूझिक क्लिप निवडण्याची प्रक्रिया अगदी सारखी आहे. आता हे व्हॉट्सॲपवर देखील रोल आऊट केल्यानंतर, मेटाने त्यांच्या सर्व प्लॅटफॉर्मवर समान वापरकर्ता अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हॉट्सॲपसोबतच आता इंस्टाग्रामवर देखील दोन मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. कंपनीने सांगितले की आता कंटेट प्रोफाइल ग्रिडवर स्क्वेयर ऐवजी रेक्टेंगल बॉक्समध्ये दिसेल. याशिवाय आता मित्रांच्या पसंतीच्या रील वेगळ्या सेक्शनमध्ये दिसणार आहेत. या दोन बदलांबद्दल कंपनीने काय सांगितलं आहे, याबद्दल जाणून घेऊया. इंस्टाग्रामचे चीफ ॲडम मोसेरी म्हणाले की रेक्टेंगल बॉक्समध्ये कंटेट दर्शविणारे फीचर या आठवड्याच्या शेवटी रोलआउट केले जाईल.
Tech Tips: छोट्या रिचार्जमध्येही दिवसभर चालेल WhatsApp, फक्त करा ही छोटी सेटिंग!
आता इंस्टाग्रामने त्यांचे जुने फीचर एका नवीन स्वरूपात रोलआऊट केलं आहे. वास्तविक, इंस्टाग्रामने 2019 मध्ये अॅक्टिव्हिटी फीड बंद केले होते. यामध्ये यूजर्सना ते व्हिडीओ दाखवण्यात आले जे त्यांच्या मित्रांनी लाईक केले होते. आता नवीन फीचरमध्ये, Reels फीडमध्ये एक नवीन टॅब दिसेल, ज्यामध्ये त्यांच्या मित्रांनी लाईक केलेले किंवा कमेंट केलेले व्हिडिओ दिसतील.