यूएस निवडणुकीपूर्वी Elon Musk ने X वर घेतली Donald Trump ची मुलाखत (फोटो सौजन्य - Elon Musk X account)
यूएस निवडणुकीपूर्वी आज X चा मालक Elon Musk याने अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार Donald Trump यांची मुलाखत घेतली. पण ही मुलाखत सुरु व्हायला काहीसा उशीर झाला. कारण मुलाखत सुरु होण्यापूर्वीच त्यांना टेक्निकल ग्लिचचा सामना करावा लागला. याचा दोष Elon Musk ने डीडीओएस अटॅकला दिला आहे. डीडीओएस अटॅकमुळे मुलाखतीला उशीर झाल्याचं Elon Musk ने म्हटलं आहे. ही मुलाखत भारतीय वेळेनुसार आज पहाटे साडेपाच वाजता प्रसारीत होणार होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे मुलाखतीचे प्रसारण सुरु व्हायला वेळ लागला. याबाबत Musk ने X अकाऊंटवर माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा- Realme C सिरीजमधील Realme C63 5G लाँच, कमी किंमतीत मिळणार अनेक फिचर्स
हल्ल्याबाबत माहिती देताना Musk ने म्हटलं की, मोठ्या प्रमाणावर DDoS हल्ला झाल्याचे दिसत आहे. हा हल्ला बंद करण्याचे काम सुरू आहे. सर्वात वाईट परिस्थितीत, आम्ही थोड्या संख्येने दर्शकांसह लाईव्ह जात आहोत आणि Donald Trump यांच्याशी सुरु असलेलं संभाषण नंतर पोस्ट करू.
हेदेखील वाचा- Amazon वर सुरू आहे Great Freedom Festival! लॅपटॉप आणि स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट, खरेदीची संधी चुकवू नका
Elon Musk अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार Donald Trump यांची थेट मुलाखत घेणार होते. ज्याचा एक व्हिडिओ Donald Trump यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. त्यांनी सांगितलं होतं की, त्यांचे संभाषण अनस्क्रिप्टेड असेल. Elon Musk ने जाहीर केले होते की ते 12 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री 8 वाजता Donald Trump यांच्याशी थेट संभाषण करणार आहेत. मात्र ही मुलाखत सुरु व्हायला काहीसा उशीर झाला. कारण मुलाखत सुरु होण्यापूर्वीच त्यांना टेक्निकल ग्लिचचा सामना करावा लागला.
2021 मध्ये यूएस कॅपिटल हिंसाचारानंतर, Trump यांचे ट्विटर अकाउंट कायमचे बॅन करण्यात आले होते. त्यानंतर Trump यांनी ट्रुथ सोशल नावाने स्वतःचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केले. गेल्या वर्षी त्यांनी त्यांच्या पोस्टसाठी ट्रुथ सोशलचा वापर केला. मात्र आता त्यांच्या X अकाऊंटवरील निर्बंध अखेर हटवण्यात आले आहेत.
यूएस निवडणुकीपूर्वी अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार Donald Trump सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X वर परतले आहेत. काही दिवसांपूर्वीच Meta ने Donald Trump यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरील बंदी उठवली होती. Meta ने सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांना समान संधी मिळायला हवी. त्यानंतर आज अमेरिकन वेळेनुसार रात्री 8 वाजता आणि भारतीय वेळेनुसार पहाटे साडेपाच वाजता Elon Musk सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X वर Donald Trump यांची मुलाखत घेणार होते. याबाबत दोघांनीही त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून माहिती दिली होती. मात्र टेक्निकल ग्लिचमुळे मुलाखतीला उशीर झाला. याचा संपूर्ण दोष Elon Musk ने डीडीओएस अटॅकला दिला आहे.
डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिस (DDoS) हल्ला ही लक्ष्यित सर्व्हर, सेवा किंवा नेटवर्कच्या सामान्य रहदारीमध्ये व्यत्यय आणण्याची एक पद्धत आहे. ज्या अंतर्गत लक्ष्य किंवा त्याच्या आसपासच्या मूलभूत पायाभूत सुविधांवर इंटरनेट ट्रॅफिकच्या नेटवर्कचा परिणाम होतो.
मायक्रोसॉफ्टच्या मते, DDoS हल्ल्यादरम्यान, बॉट्स किंवा बॉटनेटची मालिका, ट्रॅफिकसह वेबसाइट भरते. हल्ल्याच्या वेळी अनेक संगणक एका संगणकावर हल्ला करतात आणि कायदेशीर युजर्सना बाहेर काढतात. परिणामी, प्लॅटफॉर्मवर सुरू झालेली कोणतीही सेवा किंवा प्रवाह विलंबित होऊ शकतो किंवा काही काळ थांबू शकतो. हल्ल्यादरम्यान संवेदनशील माहिती मिळवून हॅकर्स तुमच्या डेटाबेसमध्येही घुसखोरी करू शकतात.