
Trump Military Action in Iran
इराणमध्ये नरसंहार! खामेनेईंच्या आदेशानंतर सुरक्षा दलांचा आंदोलकांवर भीषण गोळीबार, हजोरांच्या अंत?
इराणमध्ये सध्या वाढते आर्थिक संकट, महागाई, बेरोजगारी यामुळे जनतेमध्ये खामेनी सरकारविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. डिसेंबर २०२५ च्या अखेपासून इराणी नागरिक रस्त्यांवर उतरले असून खामेनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत आहेत. सुरुवातील यामध्ये केवळ आर्थिक संकट आणि वाढत्या महागाईबाबत घोषणा दिल्या जात होत्या. पकंतप यानंतर इस्लामी सत्तेविरोधात आंदोलन पेटले. तरुण, विद्यार्थी, कामगार, सामान्य नागरिक रस्तांवर उतरले असून सराकविरोधी घोषणांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
याच पार्श्वभूमीवर अमेरिका सध्या इराणमधील संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या आंदोलना हिंसाचार वाढत चालला आहे. यामुळे ट्रम्प यांना इराणमध्ये कारवाईच्या पर्यायांची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने इकाणच्या लष्करी तळांचा, सरकारच्या अंतर्गत सुरक्षा आणि रचनेचा लक्ष्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. परंतु अद्याप ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याचा कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.
८ जानेवारी २०२६ पासून इराणमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे इराणमधील परिस्थितीबाबत स्पष्ट माहिती अद्यापर समोर आलेली नाही. परंतु मीडियामध्ये परंतु आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तांनुसार आणि मानवाधिकार संघटनांच्या माहितीनुसार, खामेनी सरकारने आंदोलन चिरडण्याचे आदेश दिले आहे. यामुळे सुरक्षा दलांनी निदर्शनकर्त्यांवर गोळीबार केला आहे. या भीषण गोळीबारात हजारो जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान इराणच्या सरकारने या आंदोलनासाठी बाह्य शक्ती जबाबादर असल्याचा आरोप केला आहे. परंतु अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टता आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून इराणमध्ये हल्ल्याचे संकेत मिळाले आहे.
अमेरिकेच्या निशाण्यावर आता इराण? सत्तापालट टाळण्यासाठी खामेनेईंनी उचलले मोठे पाऊल