Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम
टेक्निकल गुरुजी म्हणजेच गौरव चौधरी यांनी आयफोन 17 प्रो मॅक्स ‘जय श्री राम ऑरम एडिशन’ लाँच केले आहे. हे जगातील एकमेव एडीशन आहे. गौरव चौधरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलवर या आयफोनच्या अनबॉक्सिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जय श्री रामची घोषणा देत फोनचे अनबॉक्सिंग करण्यात आले आहे. गौरव चौधरी यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ अगदी कमी काळातच व्हायरल झाला आहे. हा फोन सॉलिड गोल्ड प्लेटेड आहे आणि यामध्ये टेक्नोलॉजी आणि भक्ती यांचे अनोखे संगम दाखवण्यात आले आहे. टेक्नोलॉजी गुरुजी यांनी याला Faith Meets Luxury and Technology असं नाव दिलं आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला विश्वास, लग्जरी आणि टेक्नोलॉजी यांचे अनोखे संगम पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Instagram)
आयफोन 17 प्रो मॅक्स ‘जय श्री राम ऑरम एडिशन’ ची किंमत सुमारे 20 लाख ते 50 लाख रुपये यांच्या दरम्यान असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. फोनचे अनबॉक्सिंग ‘जय श्री राम’ मंत्र आणि शानदार सेटअपसह करण्यात आले.
अॅपलचा लेटेस्ट आयफोन 17 प्रो मॅक्स, 2025 मधील सर्वात अॅडवांस फोन मानला जात आहे. या आयफोन मॉडेलमध्ये कटिंग-एज फीचर्स जसे सुपरफास्ट प्रोसेसर, अमेजिंग कॅमेरा आणि दिर्घकाळ बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. टेक्निकल गुरुजी यांनी आता या अॅडवांस फीचर्सने सुसज्ज असलेल्या आयफोन 17 प्रो मॅक्सला इंडियन टच देऊन ‘ऑरम एडिशन’ तयार केले आहे. म्हणजेच सोन्या – चांदीच्या चकसह भक्तीचा रंग!
तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही
‘जय श्री राम ऑरम एडिशन’ टेक्निकल गुरुजी यांचे कॉन्सेप्ट क्रिएशन आहे. म्हणजेच हे एडिशन टेक्निकल गुरुजी यांनी या एडीशनचे डिझाईन आणि आयडिया सादर केले. हे खास एडिशन कीव (युक्रेन) येथील कस्टम डिझाइन कंपनी ऑरमने तयार केली आहे.
Ans: Technical Guruji हे YouTube वरील टेक चॅनेल आहे, जिथे ते स्मार्टफोन्स, टेक गॅजेट्स, रिव्ह्यू, अनबॉक्सिंग आणि टेक अपडेट्स देतात.
Ans: त्यांचे खरे नाव गौरव चौधरी आहे.
Ans: त्यांचे व्हिडिओ हिंदी भाषेत असतात.






