तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही
ज्याप्रमाणे सेंकड हँड किंवा नकली आयफोनची विक्री केली जाते. त्याचप्रमाणे नकली चार्जिंग केबलची देखील विक्री केली जाते. पण या नकली केबल देखील अगदी खऱ्याप्रमाणे दिसतात, त्यामुळे यातील फरक ओळखण फारच कठीण असतं. यासाठीच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला समजू शकेल की तुम्ही खरेदी केलेली आयफोनची चार्जिंग केबल असली आहे की नकली. जर तुम्ही खरेदी केलेली केबल नकली असेल तर यामुळे तुमच्या आयफोनला नुकसान पोहोचू शकतं आणि त्याची बॅटरी खराब होण्याची देखील शक्यता असते. (फोटो सौजन्य – Pinterest)
नकली केबल अगदी खऱ्यासारखी दिसते त्यामुळे पाहता क्षणी त्याला ओळखणं फार कठिण आहे. पॅकेजिंग, डिझाईन, फिनिश सगळंकाही अगदी खऱ्याप्रमाणे दिसते. त्यामुळे दिसण्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका. अशा परिस्थितीत काय करावं यासाठी Apple Store ने सल्ला दिला आहे. सर्वात आधी बॉक्स आणि केबलवरील सर्व मार्किंग अगदी लक्षपूर्वक पाहा. टेक्स्चर आणि पैकिंग क्वालिटी चेक करा. सीरियल नंबर आणि मॉडल कोड जुळवा.
Apple केबल्स सहसा चीन, वियतनाम आणि आता भारतात तयार केल्या जातात. असली केबलमध्ये Type-C कनेक्टरच्या मेटल पार्टजवळ सीरियल नंबर आणि मॅन्युफॅक्चरिंग रीजन लिहीलेला असतो. नकली केबलमध्ये हा सिरीअल नंबर दिला जात नाही, किंवा लोकेशन चुकीचे लिहीले जाते.
खरी केबल ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे मजबूत ब्रेडेड डिझाईन, दोन्ही टोकाला रिइनफोर्स्ड मेटल प्रोटेक्शन,
टाइट फिटिंग आणि स्मूथ फिनिश अशी आहे. बनावट केबल्स सहसा लूज फिट असतात आणि निकृष्ट दर्जाचे असतात. टोके कमकुवत आणि सैल असतात.
Ans: iPhone 15 आणि पुढील मॉडेल्स – USB-C केबल iPhone 14 आणि आधीच्या मॉडेल्स – Lightning केबल
Ans: USB-C ते USB-C केबल + 20W किंवा त्यापेक्षा जास्त पॉवर अॅडॉप्टर वापरल्यास फास्ट चार्जिंग मिळते.
Ans: वायरलेस चार्जिंग पॅडलाही पॉवर देण्यासाठी केबल व अॅडॉप्टर लागतात.






