
कॅमेरा डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही! Realme GT 8 Pro युजर्ससाठी घेऊन येणार एक खास सरप्राईज, या दिवशी भारतात होणार लाँच
Realme भारतात लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने या स्मार्टफोनचे नाव आणि लाँच डेट आधीच जाहीर केली आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन Realme GT 8 Pro हा 20 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. Realme चा हा स्मार्टफोन चीनमध्ये गेल्या महिन्यात लाँच करण्यात आलेल्या Realme GT 8 सीरीजचा भाग आहे. कंपनी सुमारे एका महिन्यानंतर आता हा स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे.
Realme GT 8 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटसह भारतात लाँच केला जाणार आहे. या चिपसेटसह लाँच होणारा हा दुसरा स्मार्टफोन असणार आहे. Realme GT 8 Pro स्मार्टफोन परफॉर्मंस सेंट्रिक फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, जो AI आणि दमदार फीचर्ससह लाँच केला जाणार आहे. Realme GT 8 Pro स्मार्टफोनमध्ये कंपनी LPDDR5X रॅम आणि UFS 4.1 स्टोरेजसह डिस्प्ले आणि इमेज प्रोसेसिंगसाठी Hyper Vision+ AI चिप ऑफर करते. (फोटो सौजन्य – X)
What kind of magic happens when the switchable camera bump of realme GT 8 Pro meets different daily outfits? pic.twitter.com/GyqgRbiREx — realme Global (@realmeglobal) November 7, 2025
Realme GT 8 Pro मध्ये 2K डिस्प्ले दिला जाणारा आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 7,000 निट्स आणि रिफ्रेश रेट 144Hz असणार आहे. या आगामी स्मार्टफोनमध्ये OnePlus 15 आणि OPPO Find X9 सीरीजसारखा टॉप नॉच डिस्प्ले ऑफर केला जाणार आहे. हीट मॅनेजमेंटसाठी Realme च्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 7,000 sq mm वेपर चेंबर दिला जाणार आहे. दुसऱ्या अँड्रॉईड फ्लॅगशिपप्रमाणेच GT 8 Pro मध्ये देखीस कंपनी मोठी बॅटरी ऑफर करणार आहे. ज्यामुळे युजर्स एकदा चार्ज केल्यानंतर दिर्घकाळ स्मार्टफोनचा वापर करू शकणार आहेत. Realme GT 8 Pro मध्ये 7,000mAh बॅटरी दिली जाणार आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.
Realme GT 8 Pro चे एक खास फीचर म्हणजे त्याचे कॅमेरा डिझाईन असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनी स्विचेबल कॅमेरा बंप डिझाईन ऑफर करणार आहे. यूजर्स कॅमेरा बंप त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या शेप, स्टाईल आणि थीममध्ये बदलू शकणार आहेत. रियलमी GT 8 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. हा स्मार्टफोन भारतात दोन रंगात लाँच केला जाणार आहे. ज्यामध्ये डेरी व्हाईट आणि अरबन ब्लू या रंगांचा समावेश असणार आहे.
रियलमीच्या या फोनला पाणी आणि धुळीपासून संरक्षण देण्यासाठी IP69 रेटिंग देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये मेटल फ्रेम देण्यात आले आहे. याचे 2.5D कर्व एज डिझाईन अधिक चांगली ग्रिप ऑफर करते. या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट त्याचा कॅमेरा बंप असणार आहे. या अनोख्या डिझाईनमुळे युजर्स या स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी प्रचंड उत्सुक आहेत. लवकरच या दमदार स्मार्टफोनची एंट्री भारतात होणार आहे.
Ans: Realme ही चीनमधील एक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे, जी 2018 मध्ये स्थापन झाली आणि ती OPPO च्या उपकंपनी म्हणून सुरू झाली होती.
Ans: Realme ची स्थापना Sky Li (स्काय ली) यांनी केली, जे पूर्वी OPPO चे उपाध्यक्ष होते.
Ans: Realme स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच, इअरबड्स, टॅब्लेट, लॅपटॉप, टीव्ही आणि IoT (Internet of Things) डिव्हाइसेस तयार करते.