Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Grokipedia Vs Wikipedia: एलन मस्कच्या नव्या एनसाइक्लोपीडियाचे हे आहेत 5 मोठे फरक, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलन मस्कने अलीकडेच Grokipedia नावाचे ऑनलाइन एनसाइक्लोपीडिया लाँच केले होते. मात्र हे प्लॅटफॉर्म Wikipedia पेक्षा किती वेगळे आहे, तुम्हाला माहिती आहे का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 08, 2025 | 10:23 AM
Grokipedia Vs Wikipedia: एलन मस्कच्या नव्या एनसाइक्लोपीडियाचे हे आहेत 5 मोठे फरक, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Grokipedia Vs Wikipedia: एलन मस्कच्या नव्या एनसाइक्लोपीडियाचे हे आहेत 5 मोठे फरक, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Follow Us
Close
Follow Us:
  • Wikipedia जगातील सर्वात मोठे ऑनलाइन नॉलेज प्लॅटफॉर्म
  • Grokipedia v0.1 वर्जन ऑनलाइन फ्रीमध्ये उपलब्ध
  • Wikipedia वर सध्या 209 मिलियनहून अधिक पेज उपलब्ध

टेक दिग्गज एलन मस्क यांनी त्यांचे स्वत:चे आर्टिफिशियल इंटेलिजेंस-आधारित ऑनलाइन एनसाइक्लोपीडिया Grokipedia लाँच केले आहे. Wikipedia ला टक्कर देण्यासाठी एलन मस्कने Grokipedia लाँच करण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरी देखील या दोन्ही प्लॅटफॉर्म्समध्ये बराच फरक आहे. मस्क बऱ्याच काळापासून Wikipedia वर वेगवेगळे आरोप आणि टिका करत आहेत. त्यामुळेच Wikipedia ला मागे टाकण्यासाठी मस्कने Grokipedia लाँच केले. सध्या Grokipedia v0.1 वर्जन ऑनलाइन फ्रीमध्ये उपलब्ध आहे. तथापी, Grokipedia मध्ये विकिपीडियाच्या तुलनेत कमी लेख उपलब्ध आहेत. या दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये बराच फरक आहे. हाच फरक आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कॅमेरा डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही! Realme GT 8 Pro युजर्ससाठी घेऊन येणार एक खास सरप्राईज, या दिवशी भारतात होणार लाँच

मानव विरुद्ध आर्टिफिशियल इंटेलिजेंस

Wikipedia हे असे प्लॅटफॉर्म आहे जे जगभरातील लाखो ह्यूमन वॉलंटियर्सद्वारे चालवले जाते. जे या प्लॅटफॉर्मवर लेख लिहीतात, एडीट करतात आणि त्यांची अचूकता तपासतात. याच कारणामुळे हे जगातील सर्वात मोठे ऑनलाइन नॉलेज प्लॅटफॉर्म मानले जाते. या 12.3 करोडहून अधिक अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. तर, Grokipedia हे पूर्णपणे AI वर आधारित आहे. हे प्लॅटफॉर्म एलन मस्कची कंपनी xAI ने तयार केले आणि यामध्ये तेच AI चॅटबॉट Grok काम करते. हे चॅटबोट माहिती तयार करण्यासाठी आणि फॅक्ट चेक करण्यासाठी वापरले जाते. या वेबसाईटनुसार, Grokipedia काही माहिती Wikipedia कडून Creative Commons License अंतर्गत घेते. (फोटो सौजन्य – Pinterest) 

एडिटिंग सिस्टममध्ये मोठा फरक

Wikipedia मध्ये कोणताही युजर कोणतेही पेज एडीट करू शकते. मात्र काही खास पेज नवीन युजर्ससाठी लॉक ठेवले जातात, ज्यामुळे चुकीची माहिती आणि स्पॅम रोखण्यासाठी मदत होणार आहे. एडीट करण्यात आलेला कंटेट एडिटर्स आणि ऑटोमेटेड सिस्टम्सद्वारे व्हेरिफाय केला जातो. मात्र Grokipedia मध्ये थेट एडीट करणं शक्य नाही. यूजर्स केवळ फीडबॅक फॉर्मद्वारे एडिट करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकतात. जर तुमची ही विनंती मंजूर करण्यात आली तरच बललेला कंटेट वेबसाईटच्या See Edits टॅबमध्ये पाहायला मिळणार आहे.

आर्टिकल्सच्या संख्येत मोठं अंतर

Wikipedia वर सध्या 209 मिलियनहून अधिक पेज उपलब्ध आहेत, तर Grokipedia सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. Grokipedia वर सध्या 8.8 लाख पेज उपलब्ध आहेत. एलन मस्कचं असं म्हणणं आहे की, येणाऱ्या v1 वर्जनमध्ये प्लॅटफॉर्मची क्षमता आणि कंटेटमध्ये अधिक सुधारणा केली जाणार आहे.

भाषेची उपलब्धता

भाषेच्या बाबतीत Wikipedia खूप पुढे आहे. हे प्लॅटफॉर्म 343 भाषांमध्ये उपलब्ध आहे, तर Grokipedia सध्या केवळ 47 भाषांमध्ये युजर्ससाठी उपलब्ध आहे. कंपनी भविष्यात त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आणखी भाषा जोडू शकते, ज्यामुळे युजर्सच्या संख्येत देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

2025 मध्ये तुम्हीही बनू शकता सोशल मीडिया स्टार! हे 5 फ्री फोटो एडिटिंग अ‍ॅप्स तुम्हाला करतील व्हायरल, आत्ताच करा ट्राय

बिजनेस मॉडल

Wikipedia हे विकिमीडिया फाउंडेशन नावाच्या एका ना-नफा संस्थेद्वारे चालवले जाते. ते त्याच्या कामकाजासाठी पूर्णपणे देणग्या आणि अनुदानांवर अवलंबून असते. तर Grokipedia एलन मस्कची कंपनी xAI चा भाग आहे, ज्याला 2023 मध्ये लाँच करण्यात आले होते. हे एक फॉर-प्रॉफिट म्हणजेच नफा कमावणारी कंपनी आहे. जे त्याच्या AI उत्पादनांमधून उत्पन्न मिळवते.

भविष्याची दिशा

Grokipedia सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र एलन मस्कच्या भविष्यातील विजननुसार हे एक AI-संचालित ज्ञानाचे भविष्य बनू शकते. जर Grokipedia ला Wikipedia प्रमाणे विश्वास मिळवण्यात यश आले, तर येत्या काळात इंटरनेटचे जग पूर्णपणे बदलणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Wikipedia म्हणजे काय?

    Ans: Wikipedia ही एक मोफत, ओपन-सोर्स ऑनलाइन ज्ञानकोश (encyclopedia) आहे, जिथे जगभरातील लोक एकत्रितपणे माहिती लिहितात आणि संपादित करतात.

  • Que: Wikipedia ची स्थापना कोणी केली?

    Ans: Wikipedia ची स्थापना Jimmy Wales आणि Larry Sanger यांनी 15 जानेवारी 2001 रोजी केली.

  • Que: Wikipedia किती भाषांमध्ये उपलब्ध आहे?

    Ans: Wikipedia 300 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Web Title: Technology news marathi what is the difference between grokipedia and wikipedia know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • elon musk
  • Tech News

संबंधित बातम्या

कॅमेरा डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही! Realme GT 8 Pro युजर्ससाठी घेऊन येणार एक खास सरप्राईज, या दिवशी भारतात होणार लाँच
1

कॅमेरा डिझाईन पाहून विश्वास बसणार नाही! Realme GT 8 Pro युजर्ससाठी घेऊन येणार एक खास सरप्राईज, या दिवशी भारतात होणार लाँच

2025 मध्ये तुम्हीही बनू शकता सोशल मीडिया स्टार! हे 5 फ्री फोटो एडिटिंग अ‍ॅप्स तुम्हाला करतील व्हायरल, आत्ताच करा ट्राय
2

2025 मध्ये तुम्हीही बनू शकता सोशल मीडिया स्टार! हे 5 फ्री फोटो एडिटिंग अ‍ॅप्स तुम्हाला करतील व्हायरल, आत्ताच करा ट्राय

स्टाईल आणि तंत्रज्ञानाचे अनोखे संगम; मेटाचे एआय ग्‍लासेस भारतात दाखल, ‘या’ तारखेपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध
3

स्टाईल आणि तंत्रज्ञानाचे अनोखे संगम; मेटाचे एआय ग्‍लासेस भारतात दाखल, ‘या’ तारखेपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध

LinkedIn वर सुरु झाला सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! या पद्धतीने लोकांना केलं जातंय ट्रार्गेट, तुमच्या सुरक्षेसाठी फॉलो करा या Tips
4

LinkedIn वर सुरु झाला सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! या पद्धतीने लोकांना केलं जातंय ट्रार्गेट, तुमच्या सुरक्षेसाठी फॉलो करा या Tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.