Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?

Samsung Galaxy Tab A11+ Price Update: सॅमसंगने पुन्हा एकदा त्यांच्या गॅलेक्सी टॅब ए11+ टॅब्लेटच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता या डिव्हाईसचे सर्व व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 15, 2026 | 11:04 AM
Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?

Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?

Follow Us
Follow Us:
  • Galaxy Tab A11+ च्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करण्याची घोषणा
  • टॅब्लेटच्या चारही व्हेरिअंट्सच्या किंमतीत वाढ केली आहे
  • सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए11+ ची सुरुवातीची किंमत 33,999 रुपये झाली
Samsung Galaxy Tab A11+ Price Hiked: जागतिक स्तरावर मेमरी चिप्सच्या वाढत्या किंमतींचा परिणाम भारतातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतींवरही होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध कंपन्यांच्या स्मार्टफोन्सच्या किंमतीत सतत वाढ होत आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होत आहे. टेक कंपनी सॅमसंगने यापूर्वी त्यांच्या काही स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. याप्रमाणे नवीन किंमती लागू देखील करण्यात आल्या आहेत. आता कंपनीने त्यांच्या एका टॅब्लेटच्या किंमतीत वाढ केली आहे.

Apple यूजर्सना करावी लागणार प्रतिक्षा! iPhone 18 च्या लाँचिंगसाठी होऊ शकतो उशीर, काय आहे कारण? जाणून घ्या

सॅमसंगने त्यांच्या Galaxy Tab A11+ च्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी कंपनीने नोव्हेंबर महिन्यात या टॅब्लेटची किंमत 3 हजार रुपयांनी वाढवली होती. आता पुन्हा एकदा या डिव्हाईसची किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए11+ च्या किंमतीत वाढ

असं सांगितलं जात आहे की, सॅमसंगने पुन्हा एकदा त्यांच्या सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए11+ च्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने या टॅब्लेटच्या चारही व्हेरिअंट्सच्या किंमतीत वाढ केली आहे, ज्यामध्ये वाय-फाय आणि 5जी मॉडेल देखील समाविष्ट आहे. टॅबेल्टच्या नवीन किंमती सॅमसंग वेबसाईट आणि दुसऱ्या रिटेलर्स वेबसाईटवर देखील लाईव्ह झाल्या आहेत. सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए11+ ची सुरुवातीची किंमत 33,999 रुपये झाली आहे. हॅ सॅमसंग डिव्हाईस शाओमी पॅड 7 आणि वनप्लस पॅड गो 2 ला थेट टक्कर देणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए11+ च्या नवीन किंमती

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए11+ च्या 6GB + 128GB वाय-फाय व्हेरिअंट 22,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. पहिल्या दरवाढीनंतर या डिव्हाईसची किंमत 30,999 रुपये झाली होती. आता हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी 33,999 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिव्हाईसच्या 6GB + 128GB सेल्यूलर व्हेरिअंटची लाँच किंमत 26,999 रुपये होती. दरवाढीनंतर या डिव्हाईसची किंमत 34,999 रुपये होती. आता या डिव्हाईसची किंमत 37,999 रुपये झाली आहे.

तसेच, 8GB + 256GB वाय-फाय व्हेरिअंट 28,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. पहिल्या दरवाढीनंतर या डिव्हाईसची किंमत 38,999 रुपये झाली होती. आता हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी 41,999 रुपये मोजावे लागणार आहेत. 8GB + 256GB सेल्यूलर व्हेरिअंटची लाँच किंमत 32,999 रुपये होती. दरवाढीनंतर या डिव्हाईसची किंमत 43,999 रुपये झाली होती. मात्र आता हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी 46,999 रुपये मोजावे लागणार आहेत.

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए11+ चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए11+ मध्ये 11-इंच टीएफटी एलसीडी डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. सॅमसंगचा हा टॅब्लेट मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 चिपसेटने सुसज्ज आहे. या टॅब्लेटमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आले आहे. रिअर पॅनलमध्ये 8MP कॅमेरा आणि समोरील बाजूला 5MP चा कॅमेरा दिला आहे. या सॅमसंग टॅब्लेटमध्ये क्वाड स्पीकर सेटअप दिला आहे, जो डॉल्बी ॲटमॉसला सपोर्ट करतो. या टॅबमध्ये 25W चार्जिंग सपोर्टसह 7,040mAh बॅटरी दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Samsung Galaxy Tab A11+ ची नवीन किंमत किती आहे?

    Ans: सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए11+ ची नवीन सुरुवातीची किंमत 33,999 रुपये झाली आहे.

  • Que: Samsung Galaxy Tab A11+ च्या किंमतीत किती वाढ झाली आहे?

    Ans: कंपनीने या टॅब्लेटच्या चारही व्हेरिअंट्सच्या किंमतीत पुन्हा 3,000 रुपयांची वाढ केली आहे.

  • Que: Samsung Galaxy Tab A11+ च्या 6GB + 128GB Wi-Fi व्हेरिअंटची किंमत किती आहे?

    Ans: या व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 22,999 रुपये होती. पहिल्या दरवाढीनंतर ती 30,999 रुपये झाली आणि आता नवीन किंमत 33,999 रुपये आहे.

Web Title: Samsung galaxy tab a11 plus price hiked again in india check new prices of all 4 variants hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • samsung
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Apple यूजर्सना करावी लागणार प्रतिक्षा! iPhone 18 च्या लाँचिंगसाठी होऊ शकतो उशीर, काय आहे कारण? जाणून घ्या
1

Apple यूजर्सना करावी लागणार प्रतिक्षा! iPhone 18 च्या लाँचिंगसाठी होऊ शकतो उशीर, काय आहे कारण? जाणून घ्या

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु
2

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक
3

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो
4

Children’s Day: बालदिनानिमित्त पुन्हा द्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा! AI Prompts वापरून तयार करा खास फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.