Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: तुमचा गीझर खराब होतोय का? पाण्याच्या रंगापासून आवाजापर्यंत… या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

गीझरच्या टाकीच्या खालील बाजूला किंवा त्याच्या आजूबाजूला वारंवार पाणी साचणं, नळातून येणारे गरम पाणी पिवळसर, तपकिरी किंवा गंजल्यासारख्या रंगाचे दिसणे, पाणी गरम होताना गीझरमधून सतत आवाज येणे, ही गीझर खराब होण्याची लक्षणं आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 15, 2026 | 01:09 PM
Tech Tips: तुमचा गीझर खराब होतोय का? पाण्याच्या रंगापासून आवाजापर्यंत... या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

Tech Tips: तुमचा गीझर खराब होतोय का? पाण्याच्या रंगापासून आवाजापर्यंत... या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:
  • गीझरचा वापर सुरु करण्यापूर्वी काही संकेतांकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं
  • गीझरच्या टाकीमध्ये एक ॲनोड रॉड असते, जी टाकीला गंजापासून वाचवण्याचे काम करते
  • टँक-स्टाईल वॉटर हीटर्स 10 ते 15 वर्षे टिकतात
हिवाळा सुरु होताच घरांमध्ये गीझरचा वापर वाढू लागतो. हिवाळ्यात गीझर आपल्या घरामधील अतिशय महत्त्वाचा भाग बनतो. मात्र जर तुम्ही दिर्घकाळापासून गीझरचा वापर करत असाल तर योग्य काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. गीझरचा वापर सुरु करण्यापूर्वी काही संकेतांकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्हाला समजू शकेल की तुमच्या घरातील गीझर योग्य पद्धतीने काम करत आहे की नाही. या संकेतांबाबत आता जाणून घेऊया.

Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?

गीझरची टाकी लीक होणं

गीझरच्या टाकीच्या खालील बाजूला किंवा त्याच्या आजूबाजूला वारंवार पाणी साचल्याचे दिसत असेल तर सावध व्हा. हे गीझरची टाकी लीक झाल्याचे संकेत असू शकतात. दिर्घकाळ गीझरचा वापर केल्यानंतर त्याच्या टाकीच्या आतील भागात गंज पकडतो, ज्यामुळे संबंधित भाग कमकुवत होतो आणि यामध्ये भेगा पडू शकतात. तर काहीवेळेस कनेक्शनमधील समस्यांमुळे किंवा ड्रेन वाल्वमधील समस्येमुळे देखील पाणी साचू लागते. अशावेळी व्यावसायिक तंत्रज्ञाकडून तपासणी करून घ्या.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

पाण्याचा रंग बदलणं

जर तुमच्या नळातून येणारे गरम पाणी पिवळसर, तपकिरी किंवा गंजल्यासारख्या रंगाचे दिसू लागले, आणि थंड पाणी पूर्णपणे स्वच्छ असेल तर याचा अर्थ गीझरमध्ये समस्या असू शकते. याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजेच टाकीमधील गंज आहे. गीझरच्या टाकीमध्ये एक ॲनोड रॉड असते, जी टाकीला गंजापासून वाचवण्याचे काम करते. मात्र कालांतराने ही रॉड खराब होऊ लागते. त्यामुळे वेळीच दुरुस्ती करून रॉड बदलणं आवश्यक आहे, ज्यामुळे गीझरचे आयुष्य वाढू शकते.

गीझरमधून आवाज येणं

पाणी गरम होताना गीझरमधून सतत आवाज येत असेल तर हे गीझर खराब होण्याचे संकेत असू शकतात. खरं तर दररोजच्या वापरात पाण्यामधील मिनरल्स आणि इतर अशूद्ध घटक हळूहळू टाकीच्या खालील भागात जमा होतात. काळानुसार, यांचा एक थर तयार होतो, ज्यामुळे पाणी गरम होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो आणि गीझरमधून विविध प्रकारचे आवाज येऊ लागतात. अनेकदा ही समस्या दुरुस्तीनंतर सोडवली जाऊ शकते.

पाणी गरम होण्यासाठी बराच वेळ लागणे

जर गीझरमध्ये पाणी गरम होण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागत असेल तर हे गीझर खराब होण्याचे संकेत असू शकतात. गीझरच्या टाकीत मिनरल्स जमा झाल्याने त्याची हीटिंग क्षमता कमी होऊ शकते. तसेच, इलेक्ट्रिक गीझरमधील खराब थर्मोस्टॅट किंवा हीटिंग एलिमेंट देखील याचे कारण असू शकते. या समस्येमुळे जर तुम्ही नवीन गीझर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी टेक्निशिअनला बोलावून त्याचा सल्ला घ्या.

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु

वारंवार गीझर खराब होणं

जर तुमच्या घरातील गीझर सतत खराब होत असेल आणि त्याच्या दुरुस्तीसाठी तुम्हाला वारंवार खर्च करावा लागत असेल तर आता नवीन गीझर खरेदी करण्याची वेळ आली आहे. कारण वारंवार दुरुस्तीसाठी खर्च करण्याऐवजी नवीन गीझर खरेदी करणं एक चांगला पर्याय असू शकतो. सर्वसाधारणपणे, टँक-स्टाईल वॉटर हीटर्स 10 ते 15 वर्षे टिकतात, तर टँकलेस वॉटर हीटर्स 20 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गीझर खराब होत असल्याची लक्षणे कोणती आहेत?

    Ans: गीझरमधून पाणी गळणे, गरम पाण्याचा रंग बदलणे, विचित्र आवाज येणे, पाणी गरम होण्यासाठी जास्त वेळ लागणे आणि वारंवार बिघाड होणे ही गीझर खराब होण्याची प्रमुख लक्षणे आहेत.

  • Que: गीझरमधून पाणी गळत असेल तर काय करावे?

    Ans: गीझरच्या टाकीखाली किंवा आजूबाजूला पाणी साचत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. गीझरचा वीजपुरवठा सुरक्षितपणे बंद करून तंत्रज्ञाकडून तपासणी करून घ्या.

  • Que: गीझरमधून पिवळसर किंवा तपकिरी पाणी का येते?

    Ans: गीझरच्या टाकीमध्ये गंज जमा झाल्यामुळे गरम पाण्याचा रंग पिवळसर किंवा तपकिरी होऊ शकतो. अशावेळी ॲनोड रॉड आणि टाकीची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

Web Title: 5 signs your geyser is going bad water color strange noises and other warning signals you should never ignore hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?
1

Samsung यूजर्सना मोठा धक्का! Galaxy Tab A11+ टॅबलेट पुन्हा महागला, किती आहे नवीन किंमत?

Apple यूजर्सना करावी लागणार प्रतिक्षा! iPhone 18 च्या लाँचिंगसाठी होऊ शकतो उशीर, काय आहे कारण? जाणून घ्या
2

Apple यूजर्सना करावी लागणार प्रतिक्षा! iPhone 18 च्या लाँचिंगसाठी होऊ शकतो उशीर, काय आहे कारण? जाणून घ्या

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु
3

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक
4

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.