स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
Tecno ने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन Tecno Spark Go 5G लाँच केला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6400 प्रोसेसरने सुसज्ज आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा स्मार्टफोन या सेगमेंटमधील सर्वात स्लिम आणि हल्का 5G फोन आहे. हा स्मार्टफोन एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सल AI-पावर्ड प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजेच या स्मार्टफोनमध्ये No Network Communication कनेक्टिविटी देखील देण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे डिव्हाईस पाच वर्षांसाठी लॅग-फ्री परफॉर्मन्स प्रदान करेल.
Tecno Spark Go 5G ची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. हा स्मार्टफोन 9,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 4GB + 128GB या सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटची विक्री ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. हा हँडसेट इंक ब्लॅक, स्काय ब्लू आणि टॉर्क्वाइज ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. (फोटो सौजन्य – X)
Tecno Spark Go 5G मध्ये 6.76-इंच HD+ (720×1,600 पिक्सेल) LCD स्क्रीन देण्यात आली आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे. हा ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6400 चिपसेटने सुसज्ज आहे, ज्याला 4GB रॅम आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन Android 15-बेस्ड HiOS सह लाँच करण्यात आला आहे.
Tecno च्या Spark Go 5G स्मार्टफोन्स AI कॅपेबिलिटीजसह लाँच करण्यात आला हे, ज्यामध्ये Ella AI असिस्टेंट देखील समाविष्ट आहे, जो हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ आणि बंगाली सारख्या भारतीय भाषांना सपोर्ट करतो. हे डिव्हाईस AI राइटिंग असिस्टेंट आणि Google चे सर्कल टू सर्च टूल सारखे AI फीचर्स देखील ऑफर करते. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. मागील कॅमेरा 30 फ्रेम प्रति सेकंद वेगाने 2K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, 4G, Bluetooth, Wi-Fi, GPS आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. बॉक्समध्ये 18W चार्जिंग एडाप्टर देखील उपलब्ध आहे. हँडसेटला IP64 रेटिंग आहे, ज्यामुळे तो धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधक बनतो.
Spark Go 5G हा सेगमेंटमधील पहिला स्मार्टफोन आहे जो, 4X4 MIMO टेक्नोलॉजीला सपोर्ट करतो. यामध्ये अँटेनांचा वापर केला जातो. हा हँडसेट Tecno च्या No Network Communication वैशिष्ट्याला देखील सपोर्ट करतो. हे वैशिष्ट्य Spark Go 2 वर देखील उपलब्ध आहे, जे पात्र Tecno यूजर्सना सेल्युलर सेवेशिवाय कॉल करण्याची किंवा संदेश पाठविण्याची परवानगी देते.