
7000 mAh बॅटरीसह स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असलेला मोटोरोलाचा 'हा' फोन ठरतोय बेस्ट; किंमत फक्त...
नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात आता प्रसिद्ध कंपनी मोटोरोलाने भारतात आपला नवीन जी-सिरीज स्मार्टफोन, Moto G Max 5G लाँच केला आहे. या फोनमध्ये दमदार 7000 mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 120 Hz डिस्प्ले आणि अँड्रॉइड 16 आहे.
या फोनला MIL-STD-810H सर्टिफिकेशन आणि IP64 रेटिंग देखील आहे. याची विक्री 20 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. 7000 mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असल्याने चांगला परफॉर्मन्स मिळत आहे. मोटो जी मॅक्सचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात 27999 मध्ये उपलब्ध आहे. या फोनची विक्री फ्लिपकार्ट, मोटोरोलाची वेबसाइट आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर सुरू झाली आहे. हा फोन PANTONE स्टारगेझर, अलास्कन ब्लू आणि मालागा या रंगांमध्ये खरेदी करता येईल.
कंपनी ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्ड वापरून केलेल्या खरेदीवर 1000 चा डिस्काउंट देत आहे. मोटो जी मॅक्सच्या प्रमुख फीचर्सपैकी एक म्हणजे त्याची 7000mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी. कंपनीच्या मते, ही बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 63 तासांपर्यंतचा बॅकअप देऊ शकते. हा फोन ३०W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो आणि बॅटरी जास्त काळ टिकावी यासाठी यात ॲडव्हान्स्ड बॅटरी केअर हे फीचर्सही आहेत.
फोनमध्ये आणखी कोणते फीचर्स?
या फोनमध्ये २४००×१०८० पिक्सेल रिझोल्यूशन असलेला ६.७२-इंचाचा फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. ही स्क्रीन १२०Hz रिफ्रेश रेट, १०५० निट्सपर्यंत उच्च ब्राइटनेस, डिस्प्ले कलर बूस्ट आणि वॉटर टचला सपोर्ट करते. कॉर्निंग गोरिला ग्लास ७i डिस्प्लेचे संरक्षण करतो. परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये 4nm क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6s Gen 4 प्रोसेसर असून, त्याला 6GB LPDDR5X रॅम आणि 128GB UFS 3.1 स्टोरेजची जोड दिली आहे. 6GB फिजिकल रॅम रॅम बूस्टद्वारे 18GB पर्यंत वाढवता येते.