
Vivo X300 चा बजेट फ्रेंडली पर्याय शोधताय? 2025 चे हे आहेत बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन, यूजर्सना देतात धमाकेदार परफॉर्मेंस
Google ची Pixel A-सीरीज त्यांच्या स्टँडर्ड आणि नैसर्गिक फोटो क्वालिटीसाठी ओळखली जाते. Pixel 9a मध्ये डुअल कॅमेरा सेटअप (48MP + 13MP) देण्यात आला आहे, जो सॉफ्टवेयर प्रोसेसिंगच्या मदतीने फ्लॅगशिपप्रमाणे फोटो तयार करतो. यासोबतच 13MP चा फ्रंट कॅमेरा सेल्फी लवर्ससाठी बेस्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.3-इंच P-OLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2700 निट्सची पीक ब्राइटनेस आहे, ज्यामुळे याला एक प्रीमियम विजुअल अनुभव मिळतो. यामध्ये 23W चार्जिंग सपोर्टसह 5100mAh बॅटरी दिली आहे. जर तुम्हाला नैसर्गिंक रंग आणि उत्तम HDR वाले फोटो पाहिजे असतील तर तुम्ही हा स्मार्टफोन निवडू शकता. याची किंमत 44,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
OnePlus 13s त्याच्या 50MP + 50MP डुअल कॅमेरा सिस्टमसाठी सध्या चर्चेत आहे. याचा 32MP फ्रंट कॅमेरा डिटेल्ड आणि शार्प सेल्फी क्लिक करण्यात एक्सपर्ट आबे. या स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच LTPO AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, Dolby Vision आणि 1 बिलियन कलर्ससह हा कंटेंट पाहण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. Snapdragon 8 Elite प्रोसेसर स्मार्टफोनला सुपर-फास्ट परफॉर्मेंस देतो. फोनमध्ये 5850mAh बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनची किंमत 52,497 रुपये आहे. जर तुम्ही प्रोफेशनल लेव्हल फोटोग्राफी आणि स्मूथ परफॉर्मंस असलेले डिव्हाईस शोधत असाल तर OnePlus 13s एक उत्तम ऑल-राउंडर पर्याय आहे.
Vivo ची V-सीरीज नेहमीच कॅमेरा-फोकस्ड राहिली आहे. याचे एक उत्तम उदाहारण म्हणजे Vivo V60. हा स्मार्टफोन 50MP + 50MP + 8MP ट्रिपल कॅमेरा सेटअप Zeiss ऑप्टिक्ससह उपलब्ध आहे, ज्यामुळे फोटोची क्वालिटी अधिक चांगली होते. 50MP चा सेल्फी कॅमेरा व्लॉगर्स आणि रील-मेकर्ससाठी प्लस पॉईंट आहे. या डव्हाईसमध्ये Snapdragon 7 Gen 4 चिपसेट आणि 6500mAh बॅटरी दिली आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत 36,999 रुपये आहे.
Oppo Reno सीरीज त्यांच्या पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी ओळखली जाते. Reno 14 Pro मध्ये ट्रिपल 50MP कॅमेरा सेटअप आणि 50MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1B कलर्समुळे हा एक विश्वसनीय मल्टीमीडिया डिव्हाईस बनतो. 6200mAh बॅटरी आणि 80W सुपरफास्ट चार्जिंगमुळे हा स्मार्टफोन यूजर्ससाठी एक चांगला पर्याय ठरतो. या स्मार्टफोनची किंमत 49,999 रुपये आहे. तुम्हाला स्टायलिश डिझाईन आणि पोर्ट्रेट-फोकस्ड फोटो पाहिजे असतील तर तुम्ही Reno 14 Pro ची निवड करू शकता.
Ans: Vivo चे मुख्य हायलाइट म्हणजे त्यांचा उत्तम कॅमेरा, खासकरून पोर्ट्रेट आणि नाईट फोटोग्राफी.
Ans: साधारणपणे 1 ते 1.5 दिवस एकदा फुल चार्जवर आरामात टिकते. 5000mAh बॅटरी जास्त मॉडेल्समध्ये असते.Vivo मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो का?
Ans: होय. बहुतेक नवीन Vivo मॉडेल्समध्ये 44W, 66W किंवा 80W फास्ट चार्जिंग मिळते.