TikTok ची एन्ट्री वाढवणार Instagram चं टेंशन, यूजर्सवर काय होणार परिणाम? कोण ठरणार वरचढ?
भारतात TikTok ची पुन्हा एकदा एंट्री होण्याचे संकेत समोर आले आहेत. TikTok ची वेबसाईट भारतात पुन्हा एकदा लाईव्ह झाली आहे. त्यामुळे आता अनेक युजर्सना अशी आशा आहे की TikTok पुन्हा एकदा भारतात एन्ट्री करू शकते. खरं तर 2020 मध्ये भारताने अनेक चिनी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. यामध्ये TikTok चा देखील समावेश होता. TikTok बंद झाल्यानंतर अनेक युजर्स इंस्टाग्रामकडे वळले. त्यामुळे अगदी काही क्षणातच इंस्टाग्रामची युजर संख्या प्रचंड वाढली.
आता असे संकेत दिसू लागले आहेत की TikTok ची भारतात पुन्हा एकदा एन्ट्री होऊ शकते. जर TikTok ची भारतात पुन्हा एकदा एंट्री झाली तर याचा परिणाम इंस्टाग्रामवर होणार का, इंस्टाग्रामची युजर पुन्हा एकदा TikTok कडे वळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. TikTok ॲप बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी अनेक युजर्ससाठी ही वेबसाईट लाईव्ह झाली आहे. अनेकांना ही वेबसाईट एक्सेस करणे अगदी सहज शक्य झालं. त्यामुळे TikTok चे भारतातील जातील एन्ट्री चे संकेत अगदी दाट झाले होती. मात्र सरकारने स्पष्ट केलं आहे की, भारतातील TikTok वरील बंदी अद्याप हटवण्यात आली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारतात TikTok च्या एन्ट्रीबाबत प्रचंड चर्च सुरू आहे. काही रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की TikTok ची अधिकृत वेबसाईट VPN शिवाय भारतात ओपन केली जाऊ शकते. मात्र TikTok वरील भारतातील बॅन हटवण्यात आला नाही. मात्र जर भारतात TikTok ची इंट्री झाली तर इंस्टाग्रामचं काय, इंस्टाग्रामच्या युजर्स काय, इंस्टाग्रामचे युजर्स पुन्हा TikTok कडे वळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जर असे झाले तर इंस्टाग्राम यूजरच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. 2020 मध्ये TikTok बंद झाल्यानंतर इंस्टाग्रामला प्रचंड फायदा झाला होता. TikTok नंतर सर्वाधिक पॉप्युलरिटी इंस्टाग्रामला मिळाली. TikTok बंद होताच इंस्टाग्रामने त्यांच्या युजरसाठी रील फीचर सुरू केले. ज्यामुळे भारतातील लाखो क्रिएटर्स TikTok वरून इंस्टाग्रामकडे वळले. जे व्हिडिओ टिक टॉकवर अपलोड केले जात होते, ते व्हिडिओ काही काळाने इंस्टाग्रामवर अपलोड केले जाऊ लागले. बघता बघता इंस्टाग्रामची लोकप्रियता गगनाला भेटली.
मात्र आता जर TikTok ने पुन्हा एकदा भारतात एन्ट्री केली तर इंस्टाग्रामला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. इंस्टाग्रामला त्यांची युजर टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागू शकतात.
वापरकर्त्यांच्या निष्ठेवर परिणाम: TikTok वर आपली छाप पाडणारे अनेक क्रिएटर्स TikTok बंद झाल्यानंतर इंस्टाग्रामकडे वळले. TikTok ची एन्ट्री झाल्यास हेच क्रिएटर्स पुन्हा एकदा TikTok कडे वळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
कंटेंट क्वालिटी आणि वरायटी: TikTok चे अल्गोरिदम आणि युजर एंगेजमेंट मॉडेल आधीपासूनच अधिक मजबूत आहे.
फ्रेंड्स आणि जाहिराती: TikTok ची पॉप्युलिरिटीमुळे जाहिरातींचा मोठा हिस्सा इंस्टाग्रामकडून TikTok कडे वळू शकतो.
तथापि, हे देखील खरे आहे की TikTok च्या संभाव्य परतीचा परिणाम तात्काळ दिसून येणार नाही. गेल्या चार वर्षांत, इंस्टाग्रामने भारतात आपली मजबूत इकोसिस्टम तयार केली आहे. निर्मात्यांना कमाई, ब्रँड डील आणि जागतिक प्रेक्षकांची सुविधा देखील मिळत आहे, ज्यामुळे टिकटॉकशी स्पर्धा करण्यास मदत होईल. अशा परिस्थितीत, टिकटॉकवरील बंदी उठवली जाते की नाही हे पाहणे मनोरंजक असेल.