ट्रान्सजेंडर मुलीचा Elon Musk वर गंभीर आरोप (फोटो सौजन्य-pinterest)
अब्जाधीश उद्योगपती, टेस्लाचा सीईओ आणि X चा मालक Elon Musk पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. Elon Musk च्या मुलीने त्याच्या वर एक गंभीर आरोप केला असून तिने X वर एक पोस्ट देखल शेअर केली आहे. माझे वडील क्रूर आणि खोटारडे आहेत, माझा त्यांच्यासोबत काहीही संबंध नाही, अशा आशयाची पोस्ट Elon Musk ची ट्रांसजेंडर मुलगी जेना विल्सन हिने X वर केली आहे.
हेदेखील वाचा- गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या हातात दिसलं प्रीमियम घड्याळ! किंमत आणि फिचर्स ऐकून व्हाल हैराण
काही दिवसांपूर्वीच एका इंटरव्ह्यूमध्ये Elon Musk ने सांगितलं होत की, जेंडर बदलण्याच्या सर्जरी वेळी त्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलीकडे, एका मुलाखतीदरम्यान, Elon Musk ने सांगितले होत की वोक माइंड व्हायरसने त्याचा मुलगा झेविअर मारला गेला आहे. खरं तर Elon Musk ने येथे वोक माइंड व्हायरसचा वापर ट्रान्सजेंडर शस्त्रक्रियेला संबोधित करण्यासाठी केला होता.
हेदेखील वाचा- रोबोट खिशात हात घालून पदक जिंकू शकतात का? ऑलिंपिक चॅम्पियन नेमबाजचा Elon Musk ला प्रश्न
Elon Musk च्या याच इंटरव्ह्यूवर प्रतिक्रिया देताना त्याची ट्रांसजेंडर मुलगी जेना विल्सनने एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये तिने म्हटलं आहे की, 53 वर्षीय Elon Musk खोटे बोलणे थांबवणार नाहीत आणि ते नेहमी काल्पनिक जगात राहतात. Elon नेहमी त्याच्या स्वत: च्या भ्रामक कल्पनारम्य जगात राहतो. तो नेहमी माझ्याबद्दल चुकीचे बोलतो आणि स्वत: ला एक काळजी करणारा पिता म्हणून चित्रित करतो, जे तसे नाही. माझे वडील क्रूर आणि खोटारडे आहेत माझा त्यांच्यासोबत काहीही संबंध नाही. जेना विल्सनने X वर पोस्ट करताना Elon Musk ची एक पोस्ट रिशेअर केली आहे. Elon Musk च्या या पोस्ट मध्ये म्हटलं होत की, Elon Musk कामात खूप व्यस्त असला तरी तो आपल्या कुटुंबासाठी नेहमीच वेळ काढतो, त्याला आपल्या कुटुंबापेक्षा काही महत्त्वाचं नाही.
खरं तर, ट्रान्सजेंडर शस्त्रक्रियेनंतर, झेविअरने तिचे नाव बदलून विवियन जेना विल्सन असे ठेवले आणि तिच्या वडिलांचे आडनाव काढून तिच्या आईचे आडनाव घेतले. विल्सनच्या आईचे नाव जस्टिन विल्सन आहे, जे कॅनेडियन लेखक आहेत. जस्टिनने 2008 मध्ये मस्कला घटस्फोट दिला.
यापूर्वी देखील जेना विल्सनने Musk विरोधात अनेक विधान केली आहेत. Elon Musk चा मुलगा झेवियर आता विवियन जेना विल्सन या नावाने ओळखला जातो. त्याने 2022 मध्ये ट्रान्सजेंडर म्हणून आपली ओळख उघड केली. यानंतर Elon Musk ने जेना विल्सन विरोधात अनेक विधान केली आहेत. याबाबत काही दिवसांपूर्वीच जेना विल्सनने सांगितलं होतं की, जसे मस्कने सांगितले होते की मी मुलगी नाही, मी त्याच्यासाठी मेली आहे. असे सांगून त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लोकांसमोर त्याचं असं खोटं बोलणं मी खपवून घेणार नाही. Musk कधीही चांगल्या वडिलांप्रमाणे वागला नाही. जेव्हा आम्हा बहिणींना आणि भावांना त्याची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तो आम्हाला आमच्या आईच्या आधाराने सोडून गेला. तो जेव्हा-जेव्हा आम्हाला भेटायचा तेव्हा खूप वाईट वागायचा. त्याचे लक्ष फक्त स्वतःवर होतं.