सकाळी उठताच फोन चालवताय? मग वेळीच व्हा सावध, तुम्हीही करत आहात ही घोडचूक
स्मार्टफोन आपल्याला अनेक कामांमध्ये मदत करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या विविध कामांसाठी स्मार्टफोनचा वापर करत असतो. ऑनलाइन पेमेंट असो शॉपिंग किंवा मग कोणाला कॉल करायचा असो स्मार्टफोन आपल्याला सर्व कामांमध्ये मदत करतो. दिवसभर आपल्या हातात स्मार्टफोन असतो पण अनेकांना सकाळी उठल्यावर पहिला स्मार्टफोन होतात घेण्याची सवय असते.
Ahmedabad Plane Crash: CVR-FDR डेटाच्या मदतीने समोर येणार अपघाताचं सत्य; तासंतास आवाज होते रेकॉर्ड
असे अनेक लोक असतात जे सकाळी उठल्यावर पहिला स्मार्टफोन चेक करतात. सोशल मीडिया व्हाट्सअप, इंस्टाग्राम, मेसेज सर्व सकाळी उठल्या उठल्या आधी चेक केलं जातं. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी आहात का मग तुम्हाला वेळच सावध होण्याची गरज आहे. सकाळी उठताच पहिला स्मार्टफोनचा वापर म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्हाला कोणी विचारलं की सकाळी उठल्यानंतर आधी तुम्ही काय करता, तर 90 टक्के लोकांचे उत्तर असे असेल त्यांनी सर्वात आधीच स्मार्टफोनचा वापर करतो. सकाळीपर्यंत स्मार्टफोन्स वापर करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. तुम्हाला जरी सामान्य गोष्ट वाटत असेल तरी यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जात आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी स्मार्टफोन वापरणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. सकाळी उठल्यानंतर स्मार्टफोनचा वापर केल्यामुळे आपण कोणत्या आजारांना बळी पडू शकतो याबद्दल जाणून घेऊया.
सकाळी उठल्यानंतर कोणताही व्यायाम न करता स्मार्टफोन वापरल्याने स्मार्टफोनची ब्राईटनेस आपल्या डोळ्यांवर परिणाम करू शकतो. यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, थकवा, अस्पष्ट दिसणे यासारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. झोपेतून उठल्यानंतर लगेचच स्मार्टफोनचा वापर करणे तुमच्या मेंदूवर देखील परिणाम करू शकतो. स्मार्टफोनमधून निघणारी ब्लू लाईट तुमच्या मेंदूवरती वाईट परिणाम करू शकते.
सकाळी उठल्यावर नंतर सोशल मीडिया स्क्रोल करणं तुमच्या शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे तुम्ही अनेक गंभीरज आजारांचे बळी ठरू शकता. यामुळे चिंता तणाव आणि डिप्रेशन वाढू शकते. याशिवाय तुमच्या दिनचर्येवर देखील परिणाम होऊ शकतो.
अंथरुणावर विचित्र स्थितीत झोपून फोनचा वापर केल्याने तुमचा मानेवर आणि पाठीच्या कण्यावर परिणाम होऊ शकतो. या मानदुखीमुळे पाठीचा वरचा भाग कडक होणे आणि स्लिप डिस्क सारख्या समस्या उद्भवू शकतात. दीर्घकाळात, ते तुमच्या पोश्चरला देखील बिघडू शकते.
सकाळी उठल्यानंतर फोनवर जास्त वेळ घालवल्याने तुम्ही तुमच्या दिवसाचे प्लॅनिंग देखील करू शकत नाही. ज्या वेळी शरीराला ताजेतवाने होण्याची गरज असते, त्या वेळी तुमचे डोळे फोनच्या स्क्रीनकडे पाहत असतात. यामुळे तुमचा दैनंदिन दिनक्रम विस्कळीत होतो.