Ahmedabad Plane Crash: CVR-FDR डेटाच्या मदतीने समोर येणार अपघाताचं सत्य; तासंतास आवाज होते रेकॉर्ड
अलीकडेच एयर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा उड्डाणानंतर अगदी काही क्षणातच मोठा अपघात झाला. या अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत सध्या तपास सुरु आहे. अपघात कसा झाला, त्याचं कारण काय आहे याबाबत अधिकारी तपास करत आहेत. लंडनला जाणारं एअर इंडियाचे Air India Boeing 787-8 ड्रीमलाइनर, फ्लाइट AI-171, गुरुवारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अगदी काही क्षणातच क्रॅश झाले.
Upcoming Smartphone: भारतात लवकरच लाँच होणार Vivo चा नवा फोन, AMOLED डिस्प्लेने असणार सुसज्ज
या अपघाताचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ब्लॅक बॉक्स आपल्या ताब्यात घेतला आहे. ब्लॅक बॉक्सच्या मदतीने विमान अपघाताचे कारण समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विमानाने रनवे 23 वरून दुपारी 1:39 वाजता भारतीय वेळेनुसार उड्डाण केले. उड्डाणानंतर अगदी काही क्षणातच MAYDAY कॉल जारी करण्यात आला, अशी माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) यांनी दिली. विमान केवळ 625 फूट उंचीवर होते आणि विमानतळाबाहेरील मेघानी नगर परिसरात कोसळले. या अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली. (फोटो सौजन्य – Pinterest)
या अपघातात विमानातील क्रू मेंबर्ससह शेकडो लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांच्यासह 232 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स यांचा समावेश आहे. हे विमान लंडन गॅटविकला जात होते. या अपघातानंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर या अपघाताचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ब्लॅक बॉक्सच्या शोधाला प्राधान्य दिलं आणि सर्वात आधी ब्लॅक बॉक्स आपल्या ताब्यात घेतला. कारण ब्लॅक बॉक्स अपघाताचे कारण समोर आणण्यासाठी मदत करू शकतो.
अहमदाबाद क्रॅश (Air India Plane Crash) चा तपास करताना ब्लॅक बॉक्स महत्त्वाची भूमिका बजवणार आहे. यांत्रिक बिघाड, इंजिन बिघाड, पक्षी धडकणे, जहाजातील आग किंवा मानवी चुकीमुळे झाला आहे का हे ब्लॅक बॉक्स समोर आणू शकतं. रिकॉर्डिंग्सच्या मदतीने MAYDAY कॉल, ऑटोमेटेड इशारे आणि टेकऑफनंतरचे महत्वपूर्ण क्षण याबद्दल माहिती प्राप्त केली जाऊ शकते.
Samsung Galaxy M36: लवकरच लाँच होणार AI फीचर्सने सुसज्ज असलेला नवा स्मार्टफोन, किती असणार किंमत?
विमान 625 फूट उंचीवर कोसळत असताना नेमंक काय घडलं याचा डेटा फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) देणार आहे. याच्या मदतीने इंजिन परफॉर्मेंस, कंट्रोल सरफेस पोजीशन आणि सिस्टम इशारे याबाबत डेटा गोळा केला जाऊ शकतो. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) आपत्कालीन चेकलिस्ट, क्रू कोऑर्डिनेशन किंवा यांत्रिक समस्यांवरील चर्चा कॅप्चर करू शकतो.