Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphones: एप्रिल महिन्यात होणार धमाका! Vivo T5 Pro सह या तगड्या स्मार्टफोन्सची होणार एंट्री, असे असतील फीचर्स

Smartphones Launch in April 2026: एप्रिल महिन्यात अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. या आगामी स्मार्टफोन्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ऑनलाईन लीक झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 30, 2026 | 03:20 PM
Upcoming Smartphones: एप्रिल महिन्यात होणार धमाका! Vivo T5 Pro सह या तगड्या स्मार्टफोन्सची होणार एंट्री, असे असतील फीचर्स

Upcoming Smartphones: एप्रिल महिन्यात होणार धमाका! Vivo T5 Pro सह या तगड्या स्मार्टफोन्सची होणार एंट्री, असे असतील फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • एप्रिल महिना टेक प्रेमींसाठी अतिशय खास ठरणार
  • वनप्लस नॉर्ड CE 6 मध्ये कंपनी 7000mAh बॅटरी
  • Vivo T5 Pro चे डिझाईन आयफोन 17 प्रमाणेच
टेक कंपन्या एप्रिल महिन्यात अनेक नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. एप्रिल 2026 मध्ये लाँच केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत Vivo T5 Pro, OnePlus Nord 6, Oppo Find X9 Ultra इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे एप्रिल महिना टेक प्रेमींसाठी अतिशय खास ठरणार आहे. आगामी स्मार्टफोन्सचे काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. चला मग, कंपनीच्या आगामी स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेऊया.

Airtel Recharge Plan: कंपनीने यूजर्सना दिलं खास सरप्राइज! ‘हा’ लोकप्रिय प्रीपेड प्लॅन पुन्हा परतला, OTT सह मिळणार भन्नाट फायदे

OnePlus Nord 6 आणि Nord CE 6

टेक कंपनी वनप्लस 7 एप्रिल रोजी भारतात मोठा धमाका करणार आहे. कंपनी 7 एप्रिल रोजी OnePlus Nord 6, Nord CE 6 आणि Nord CE 6 Lite हे स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाँच करणार आहे. Nord CE 6 आणि Nord CE 6 Lite या दोन्ही फोनचे डिझाईन आणि लूक OnePlus Nord 6 प्रमाणेच असणार आहे. वनप्लस नॉर्ड CE 6 मध्ये कंपनी 7000mAh बॅटरी देणार आहे. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या OnePlus Nord CE 5 चे अपग्रेड असणार आहे. OnePlus Nord CE 6 च्या मागील बाजूला 50MP चा मुख्य प्रायमरी कॅमेरा दिला जाणार आहे. आगामी स्मार्टफोनचे फीचर्स ऑनलाईन लीक झाले आहेत. OnePlus Nord CE 6 मध्ये 6.7 इंच LED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट, 7000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. तर डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 प्रोसेसर असू शकतो.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Vivo T5 Pro

हा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन देखील भारतात लवकरच लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. फोनचे डिझाईन आयफोन 17 प्रमाणेच आहे. तसेच या बजेट स्मार्टफोनमध्ये कंपनी 9020mAh बॅटरी देणार आहे. हा आगामी विवो स्मार्टफोन iQOO Z11 चा रीब्रँडेड मॉडेल असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन भारतात 30 हजार रुपयांच्या रेंजमध्ये लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये मागील बाजूस दोन कॅमेरे असण्याची शक्यता आहे. यामध्ये OIS सह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असेल. यासाठी सोनी IMX882 सेन्सर वापरला जाण्याची शक्यता आहे. एक सेकंडरी 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा देखील अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, एक 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल.

Oppo Find X9 Ultra

Oppo Find X9 सीरीजचा हा स्मार्टफोन देखील एप्रिल महिन्यात ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला जाणार आहे. 20 एप्रिल रोजी हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. Oppo Find X9 Ultra चा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणार आहे. हा फोन 16GB रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये कंपनी 6.85 इंचाचा दमदार ओएलईडी डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरेशन 5 प्रोसेसर देऊ शकते. हा स्मार्टफोन 200MP कॅमेरासह लाँच केला जाणार आहे. हा पहिला फोन असेल ज्यामध्ये 10x ऑप्टिकल झूम दिला जाणार आहे.

Vivo V70 FE

2 एप्रिल रोजी Vivo V70 FE भारतात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये डुअल कॅमेरा सेटअप, 200 एमपी प्राइमरी शूटर, मीडियाटेक 7360 प्रोसेसर असणार आहे. Vivo V70 FE मध्ये 6.83-इंच 1.5K फ्लॅट AMOLED डिस्प्ले असू शकतो. नॉर्दन लाइट्स पर्पल आणि मानसून ब्लू या रंगांमध्ये स्मार्टफोन लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: कंपनी एकच, डिझाईनही सारखीच… दोन्ही स्मार्टफोनमध्ये काय आहे फरक? तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?

AI+ Nova 2 Ultra

Ai+ Nova 2 Ultra 5G भारतात 9 एप्रिल रोजी लाँच केला जाणार आहे. यामध्ये मागील बाजूला एक अनोखे इंटरॅक्टिव गोलाकार RGB LED लाइट स्ट्रिप दिली जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये यूनिसोक T8200 चिपसेट, 6.8 इंच 120Hz IPS डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी दिली जाणार आहे. हा स्मार्टफोन एनएक्सटीक्वांटम ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे.

Web Title: Upcoming smartphones in the april 2026 including vivo t5 pro and oppo find x9 ultra tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: कंपनी एकच, डिझाईनही सारखीच… दोन्ही स्मार्टफोनमध्ये काय आहे फरक? तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?
1

Samsung Galaxy A57 vs Galaxy A37: कंपनी एकच, डिझाईनही सारखीच… दोन्ही स्मार्टफोनमध्ये काय आहे फरक? तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?

स्टायलिश कॅमेरा आणि राक्षसी बॅटरी… Tecno च्या नव्या स्मार्टफोनची यूजर्सना पडली भूरळ, वाचा फीचर्स आणि किंमत
2

स्टायलिश कॅमेरा आणि राक्षसी बॅटरी… Tecno च्या नव्या स्मार्टफोनची यूजर्सना पडली भूरळ, वाचा फीचर्स आणि किंमत

OnePlus चा मोठा निर्णय! भारतात सेवा केंद्रांचा होणार विस्तार, 500 शहरांतील ग्राहकांना मिळणार जलद सुविधा
3

OnePlus चा मोठा निर्णय! भारतात सेवा केंद्रांचा होणार विस्तार, 500 शहरांतील ग्राहकांना मिळणार जलद सुविधा

बजेट सेगमेंटमध्ये धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या Redmi स्मार्टफोनची भारतात दमदार एंट्री; डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष
4

बजेट सेगमेंटमध्ये धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या Redmi स्मार्टफोनची भारतात दमदार एंट्री; डिझाईनने वेधलं यूजर्सचं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.