UPI यूजर्स सावधान! 1 एप्रिलपासून 'या' मोबाईल नंबरवर बंद होणार सर्विस, पेमेंट करण्यात येणार अडचणी
हल्ली सर्वचजण डिजीटल पेमेंटचा वापर करतात. डिजीटल पेमेंटमध्ये UPI चा वापर मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे UPI चे करोडो युजर्स आहेत आणि या युजर्सची सुरक्षा टिकून राहावी, यासाठी UPI नेहमीच त्यांच्या नियमांत बदल करत असते. आता देखील UPI ने त्यांच्या युजर्सच्या सुरक्षेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि नवीन नियम जारी केले आहेत.
1 एप्रिल 2025 पासून UPI चे नवीन नियम लागू होत आहेत. या नवीन नियमांचा गुगल पे, फोनपे आणि पेटीएम सारख्या पेमेंट अॅप्सच्या युजर्सवर परिणाम होणार आहे. वास्तविक, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने म्हटले आहे की ते UPI शी जोडलेले ते मोबाईल नंबर बँक अकाऊंटमधून काढून टाकतील जे बऱ्याच काळापासून बंद आहेत. याचा अर्थ असा की जर तुमचे बँक अकाऊंट एखाद्या निष्क्रिय क्रमांकाशी जोडलेले असेल तर ते हटवले जाईल. यानंतर, निष्क्रिय क्रमांकांद्वारे UPI व्यवहार शक्य होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही देखील यापैकी एक असाल तर या नियमाचा तुमच्यावर देखील परिणाम होऊ शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
गेल्या काही काळापासून देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. स्कॅम मोबाईल नंबरव्दारे लोकांची फसवूणक केली जाते आणि त्यांच्या बँक अकाऊंटमधून पैसे काढले जातात. याच सर्व गोष्टींचा विचार करता आता नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एनपीसीआयने एक नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एनपीसीआयचे म्हणणे आहे की निष्क्रिय क्रमांकांमुळे यूपीआय आणि बँकिंग प्रणालींमध्ये तांत्रिक बिघाड होतो. टेलिकॉम ऑपरेटर इतर वापरकर्त्यांना निष्क्रिय नंबर देतात, ज्यामुळे फसवणुकीचा धोका वाढतो. यामुळे आता असे मोबाईल नंबर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, NPCI ने बँका आणि UPI अॅप्सना दर आठवड्याला निष्क्रिय मोबाइल नंबरच्या नोंदी सुधारण्यास सांगितले आहे.
या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम त्या युजर्सवर होईल ज्यांनी नवीन मोबाईल नंबर घेतला आहे, परंतु त्यांचे बँक खाते अजूनही जुन्या नंबरशी जोडलेले आहे. याशिवाय, जे युजर्स त्यांच्या निष्क्रिय मोबाइल नंबरसह UPI वापरत आहेत त्यांना देखील या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागेल. जर तुमचे बँक खाते जुन्या नंबरशी किंवा आता सक्रिय नसलेल्या नंबरशी जोडलेले असेल, तर तुमचा नंबर बँक खात्याशी अपडेट करा. तसेच, तुमच्या टेलिकॉम सेवा प्रदात्याशी संपर्क साधून निष्क्रिय नंबर सक्रिय केला जाऊ शकतो. एकदा तुमचा नंबर सक्रिय झाला की, तुम्ही 1 एप्रिल नंतरही पूर्वीप्रमाणेच UPI सेवा वापरू शकाल. अन्यथा तुमच्या मोबाईल नंबरवरील सर्विस बंद केली जाईल आणि 1 एप्रिल 2025 नंतर तुम्हाला UPI सेवा वापरण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.