देशभरात UPI डाऊन, ऑनलाइन पेमेंटमध्ये युजर्सना येतेय अडचण! हे आहेत पर्यायी मार्ग
देशभरात आज 12 एप्रिल रोजी आज सकाळपासून यूपीआय डाऊन झाला आहे. त्यामुळे युजर्सना डिजिटल पेमेंट करताना अडचणी येत आहेत. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा वापर करताना युजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि आउटेज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मवर तक्रार केली आहे. युजर्सनी त्यांच्या अहवालांमध्ये म्हटले आहे की पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारख्या अनेक अॅप्सनी काम करणे थांबवले आहे किंवा त्यांना पेमेंट करण्यात अडचणी येत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अडचणींचा सामना करावा लागला. डाउनडिटेक्टरमधील आउटेज ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मच्या आकडेवारीनुसार, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तक्रारींची संख्या सर्वाधिक झाली, ज्यामध्ये 1200 हून अधिक युजर्सनी समस्यांची तक्रार केली. अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत तक्रार केली. तर काहींनी याबाबत मिम्स देखील शेअर केले आहेत. ऑनलाईन पेमेंटमध्ये अडचणी येत असल्याने युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. कारण सध्याच्या डिजीटल काळात सर्वजण ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून असतात. अशातच यूपीआय डाऊन झाल्याने युजर्सना पेमेंट करता येत नव्हता. (फोटो सौजन्य – Pinterest)
एका युजरने सोशल मीडियावर म्हटलं आहे की, यूपीआय बंद असल्याने डिजिटल व्यवहार थांबले आहेत. पेटीएम आणि गुगल पे वर कोणतेही पेमेंट केले जात नाही. डाउनडिटेक्टरच्या मते, 66 टक्के युजर्सना पेमेंटमध्ये समस्या आल्या, तर 34 टक्के युजर्सना निधी हस्तांतरित करता आला नाही. या समस्या वेगवेगळ्या बँका आणि अॅप्सवर दिसून आल्या, ज्यामुळे UPI नेटवर्कमधील एका मोठ्या त्रुटीकडे लक्ष वेधले जाते.
यूपीआय चालवणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने अद्याप डिजीटल पेमेंट का बंद आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. तथापि, काही युजर्सनी नोंदवले की व्यवहारांमध्ये व्यत्यय सकाळीच सुरू झाला, ज्यामुळे डिजिटल पेमेंटवर आणखी परिणाम झाला.
me at a restaurant after upi down 😭#upidown #UPIDown
— Amit Bhai ♒️🏺 (@Luckyboy208Bhai) April 12, 2025
how I look at the shopkeeper while trying to do a upi payment today#UPIDown pic.twitter.com/4A3uGAj0Sp
— Ramen 🍉 (@CoconutShawarma) April 12, 2025
#UPIDown again. So strange!!
This is becoming way too frequent nowadays. First #UPI goes down, then banks declare their own “downtime” for UPI transactions.India ka online payment system 😂😂😂! pic.twitter.com/tZmeLAdyjw
— Vijendra Yadav (@vijendrayadav08) April 12, 2025
Just finished lunch like a boss but when I tried paying via UPI—boom! Server down. Now I’m just sitting in hotel like a wanted criminal full stomach but cooked RIP to me! 💀#upidown #UPI #phonepe #gpay #npci pic.twitter.com/BVAPHIdJ3Z
— 𝙉𝙄𝙎𝘼𝙍 𝘼𝙃𝙀𝙈𝘼𝘿 🇮🇳 (@nisar_ahemad45) April 12, 2025
The shopkeeper is looking at me while I am trying to pay via UPI#UPIDown pic.twitter.com/gWIMGkwkWo
— Vishal (@VishalMalvi_) April 12, 2025
All major banks and UPI are down.
SBI, HDFC, ICICI, Axis, BOI. Google Pay as well pic.twitter.com/qTotId4qPj
— Abhishek Yadav (@yabhishekhd) April 12, 2025