VI चा युजर्सना झटका! लाँच केला आतापर्यंतचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, किंमत वाचून तुमचेही होश उडतील
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या VI ने आता एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन म्हणजे जोर का झटका बडी जोर से, अशी परिस्थिती आहे. कारण कंपनीने लाँच केलेला हा रिचार्ज प्लॅन आतापर्यंतचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन आहे. कंपनीने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनची किंमत तब्बल 4,999 रुपये आहे.
Infinix च्या नव्या 5G स्मार्टफोनची बाजारात एंट्री, गेमर्ससाठी ठरणार वरदान! किंमत तुमच्या बजेटमध्ये
खरं तर भारतात जिओ आणि एअरटेलनंतर VI चे युजर्स अधिक आहेत. त्यामुळे कंपनी त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन ऑफर्ससह रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. मात्र यावेळी कंपनीने सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. महागाई आणि रिचार्ज प्लॅनच्या वाढत्या किंमतींना कंटाळलेले युजर्स स्वस्त आणि कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन शोधत आहेत. मात्र VI ने अचानक एवढा महागडा रिचार्ज प्लॅन लाँच करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. किंमतीप्रमाणेच या प्लॅनमध्ये फायदे देखील भरपूर आहेत, यामध्ये काही शंकाच नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
किंमत वाचून जर तुम्हाला वाटत असेल की हा फॅमिली प्लॅन आहे, तर तसं नाही. कंपनीने लाँच केलेला हा नवीन रिचार्ज प्लॅन कोणताही फॅमिली प्लॅन नाही तर इंडिविजुअल प्लॅन आहे. यामध्ये एका वर्षाची व्हॅलिटीडी देण्यात आली आहे. कंपनीने यापूर्वीच वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह अनेक रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. मात्र या प्लॅन्सची किंमत 4,000 रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र आता लाँच केलेल्या या नवीन प्लॅनची किंमत 4,000 रुपयांपेक्षा जास्त आहे.
ज्या लोकांना वारंवार रिचार्ज करण्याचा वैताग येतो, अशा लोकांसाठी हा नवीन रिचार्ज प्लॅन सुरु करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये अनेक कमाल फायदे देण्यात आले आहे. 4,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह लाँच करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना कोणत्याही स्थानिक आणि एसटीडी नंबरवर कोणत्याही निर्बंधाशिवाय अमर्यादित कॉल करण्याची सुविधा दिली जात आहे. याशिवाय, तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील. यामध्ये, तुम्हाला संपूर्ण वर्षासाठी एकूण 730GB डेटा मिळेल, म्हणजेच तुम्ही दररोज सुमारे 2GB डेटा वापरू शकता.
VI यूजर्सना हाफ डे अनलिमिटेड डेटा देखील ऑफर केला जाणार आहे. म्हणजेच तुम्ही अर्धा दिवस तुम्हाला हवे तितके इंटरनेट वापरू शकता. या योजनेत वीकेंड डेटा रोलओव्हर सुविधा देखील उपलब्ध आहे. ओटीटी अॅप्सवर ऑनलाइन कंटेंट पाहणाऱ्यांसाठी हा प्लॅन आणखी खास आहे, कारण तो अनेक ओटीटी अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देतो. यामध्ये, VI MTV, Amazon Prime Video, Sony Liv, Zee5, Playflix, Fancode, Aaj Tak आणि Manorama Max सारख्या अनेक OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध असेल.