
फोटो सौजन्य - Social Media
भारतातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनेल रिटेल साखळी असलेल्या विजय सेल्सने आपल्या ग्राहकांसाठी बहुप्रतिक्षित ‘ॲपल डेज सेल’ची सुरुवात केली आहे. हा सेल २८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होऊन ४ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार असून, देशभरातील १६० हून अधिक विजय सेल्सच्या रिटेल स्टोअर्समध्ये तसेच www.vijaysales.com या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या विशेष सेलच्या माध्यमातून ॲपलप्रेमींना ॲपलच्या प्रीमियम उत्पादनांवर आकर्षक दरात खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या ‘ॲपल डेज सेल’मध्ये नवीन आयफोन्स, मॅकबुक्स, आयपॅड्स, ॲपल वॉचेस, एअरपॉड्स तसेच विविध ॲपल अॅक्सेसरीजवर खास सवलती देण्यात येत आहेत. ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच उत्तम किंमत लाभ मिळावा, यासाठी हा सेल खास डिझाइन करण्यात आला आहे. विजय सेल्सचे संचालक श्री. निलेश गुप्ता यांनी सांगितले की, “ग्राहकांसाठी पुन्हा एकदा ‘ॲपल डेज सेल’ घेऊन येताना आम्हाला आनंद होत आहे. हा सेल केवळ सवलतीपुरता मर्यादित नसून, अत्याधुनिक ॲपल तंत्रज्ञानाचा उत्सव आहे. विशेष डील्स, एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी लाभांच्या माध्यमातून ग्राहकांना आपली डिव्हाइसेस अपग्रेड करून नव्या वर्षाची सुरुवात स्टाइलमध्ये करता यावी, हाच आमचा उद्देश आहे.”
या सेलदरम्यान आयफोन १७ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ३,००० रुपयांचे मायव्हीएस रिवॉर्ड्स लॉयल्टी पॉइंट्स दिले जाणार आहेत. हे पॉइंट्स पुढील खरेदीवेळी स्टोअरमध्ये रिडीम करता येणार आहेत. यासोबतच आयफोन एअर, आयफोन १७, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स यांसारखी अत्याधुनिक मॉडेल्स आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहेत. पूर्वीच्या मॉडेल्समध्ये रस असणाऱ्या ग्राहकांसाठी आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ई आणि आयफोन १५ हे मॉडेल्सही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही मॉडेल्स अपग्रेडिंग किंवा गिफ्टिंगसाठी उत्तम पर्याय ठरणार आहेत.
याशिवाय, चार्जर्स, केबल्स, ॲपल पेंसिल्स, केसेस यांसारख्या ॲपल अॅक्सेसरीजवरही आकर्षक सवलती देण्यात येत आहेत. निवडक ॲपल डिव्हाइसेसची ओपन बॉक्स आणि डेमो युनिट्स मर्यादित प्रमाणात विशेष किमतींमध्ये उपलब्ध असून, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्री केली जाणार आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी ॲपल केअर+ आणि प्रोटेक्ट+ योजनांवरही सुमारे २० टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच आयसीआयसीआय आणि इतर निवडक बँकांच्या कार्डधारकांना जवळपास १०,००० रुपयांपर्यंतची त्वरित सूट व एक्सचेंज बोनसचा लाभ मिळणार आहे. एकूणच, विजय सेल्सचा ‘ॲपल डेज सेल’ हा अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक ऑफर्स आणि विश्वासार्ह सेवांचा संगम असून, ॲपल डिव्हाइसेस खरेदीसाठी ही सर्वोत्तम संधी असल्याचे चित्र आहे.