OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक
OnePlus Turbo च्या लीक झालेल्या फोटोंवरून असा अंदाज लावला जात आहे की, या आगामी स्मार्टफोनमध्ये एक चौकोनी आकाराचा ड्युअल रियर कॅमेरा युनिट असू शकते. याशिवाय या आगामी डिव्हाईसमध्ये Snapdragon 7 series चिपसेट देखील दिला जाण्याची शक्यता आहे, जो 9,000mAh बॅटरीला सपोर्ट करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
वीबोवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये चीनी स्मार्टफोन मेकरने पुष्टी केली आहे की, OnePlus Turbo सीरीज लवकरच चीनमध्ये लाँच केली जाणार आहे. मात्र टेक फर्मने अद्याप अपकमिंग लाइनअपच्या मुख्य स्पेसिफिकेशन्स, फीचर्स, डिझाइन, कलर आणि लाँच डेटबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. याशिवाय OnePlus Turbo सीरीजमध्ये कोणते स्मार्टफोन्स मॉडेल्स लाँच केले जाणार आहे आणि त्यांचे नाव काय असणार, याबाबत देखील अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. येत्या काहीच दिवसांत स्मार्टफोनचे फीचर्स आणि लाँच डेट जारी केली जाण्याची शक्यता आहे.
OnePlus Turbo सीरीज आता चीनमध्ये Oppo ऑनलाईन स्टोअरद्वारे प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. देशात हा स्मार्टफोन CNY 1 म्हणजेच सुमारे 13 रुपये टोकन किंमत देऊन बुक केला जाऊ शकतो. तथापी, लिस्टिंगमध्ये स्मार्टफोनबाबत इतर कोणतीही माहिती देण्यात आली नाही. टेक फर्मने Weibo वर खुलासा केला आहे की लवकरच लाँच होणारी OnePlus Turbo सीरीज मिड-रेंज फोन म्हणून लाँच केली जाणार आहे.
अलीकडेच, OnePlus Turbo चे कथित रेंडर ऑनलाईन लीक झाले आहेत. स्मार्टफोन हिरव्या रंगात होल-पंच कटआउट डिस्प्लेसह पाहायला मिळाला होता, ज्यामध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंट-फेसिंग कॅमेरा असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन एका चौकोनी आकाराच्या रियर कॅमेरा मॉड्यूलसह पाहायला मिळाला. लीक झालेल्या फोटोंवरून असे दिसून येते की हँडसेटच्या उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कंट्रोल असतील, तर डावी बाजू रिकामी असेल. मागील पॅनल देखील प्लास्टिकचे बनलेले असण्याची अपेक्षा आहे.
स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, लीक झालेल्या रिपोर्टनुसार, OnePlus Turbo मध्ये 1.5K रेजोल्यूशन आणि 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सह 6.8-इंच AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. या आगामी डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 7s Gen 4 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं आहे की, फोनमध्ये 9,000mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जो 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. भारतासह निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये नॉर्ड लाइनअपचा भाग म्हणून हे स्मार्टफोन्स लाँच होण्याची अपेक्षा आहे.
Ans: OnePlus Number Series, OnePlus Nord Series आणि OnePlus CE Series.
Ans: फ्लॅगशिप फीचर्स आणि प्रीमियम परफॉर्मन्ससाठी.
Ans: मिड-रेंज बजेटमध्ये प्रीमियम अनुभव हवा असलेल्या युजर्ससाठी.






