6500mAh बॅटरी वाला Vivo चा ढासू स्मार्टफोन लाँच! 5G कनेक्टिव्हिटी आणि 16GB रॅमने सुसज्ज... 36,999 रुपयांपासून सुरु आहे किंमत
टेक कंपनी वीवोने भारतात आज 12 ऑगस्ट रोजी V सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Vivo V60 या नावाने लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस Vivo V50 चे अपग्रेड मॉडेल आहे. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा किंवा तुमचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करण्यचा विचार करत असाल तर हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय आहे.
Vivo V50 या जबरदस्त डिव्हाईसमध्ये Zeiss ब्रँडचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. एवढंच नाही तर या स्मार्टफोनमध्ये AI-इमेजिंग आणि प्रोडक्टिविटी टूल्स देखील देण्यात आले आहेत. तसेच या डिव्हाईसमध्ये 6500mAh बॅटरी आहे. फोनमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे स्मार्टफोन आणखी खास फीचर्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Vivo V60 ची सुरुवातीची किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंंमत 36,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंंमत 38,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजवाल्या व्हेरिअंटची किंमत 40,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेल 45,999 रुपयांत लाँच करण्यात आले आहेत.
vivo V60 overall waala overview 🫣 pic.twitter.com/TWjF992LDI
— Mukul Sharma (@stufflistings) August 12, 2025
विवोच्या या डिव्हाईसमध्ये 6.77-इंच क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यासोबत 120Hz रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. हा हँडसेट 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7 जेनरेशन 4 प्रोसेसरने सुसज्ज आहे. 8GB पासून 16GB पर्यंत LPDDR4x रॅम व्हेरिअंटसह हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.
डिव्हईसमध्ये अँड्रॉईड 15-बेस्ड फनटच OS 15 आहे. फोनमध्ये अनेक खास AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत, ज्यामध्ये AI इमेज एक्सपँडर, AI स्मार्ट कॉल असिस्टेंट, AI कॅप्शन आणि AI-ब्लॉक स्पॅम कॉल टूलसारखे जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.
फोटोग्राफी लवर्ससाठी देखील या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आहेत. या स्मार्टफोनमध्ये Zeiss-Backed ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर देण्यात आला आहे. यासोबतच, 50-मेगापिक्सेलचा सोनी IMX882 सेन्सर आणि एक टेलिफोटो कॅमेरा आणि एक खास 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड-अँगल लेन्स उपलब्ध आहे.
रिचार्जशिवाय किती दिवस चालू राहतं SIM कार्ड? काय सांगतात TRAI चे नियम, जाणून घ्या सविस्तर
सेल्फीसाठी, फोनमध्ये एक खास 50-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. हा फोन केवळ मागील कॅमेऱ्यातच नाही तर फ्रंट कॅमेऱ्यातही 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. याशिवाय, डिव्हाइसमध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6,500mAh बॅटरी आहे.