Vivo Y400 5G: अखेर तो क्षण आलाच! 6,000mAh बॅटरी आणि अनोख्या फीचर्ससह Vivo चा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत खिशाला परवडणारी
लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड वीवोने आज म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y400 5G या नावाने लाँच करण्यात आलेला नवीन स्मार्टफोन एक मिड रेंज ऑप्शन आहे आणि अपग्रेडेड फीचर्सनी सुसज्ज असलेला स्मार्टफोन आहे. या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा दमदार स्नॅपड्रॅगन 4 जेनरेशन 2 चिपसेट देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये मोठी आणि पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनची किंमत 25 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे जे लोकं नवीन बजेट डिव्हाईसच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी Vivo Y400 5G एक उत्तम ऑप्शन ठरणार आहे.
Vivo Y400 5G स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB + 128GB आणि 8GB + 256GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 23,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन दोन कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये ग्लॅम व्हाइट आणि ऑलिव ग्रीन यांचा समावेश आहे. या डिव्हाईसची पहिली विक्री 7 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन वीवो इंडिया ई-स्टोर, फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसह इतर निवडक ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – X)
लेटेस्ट स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.67 इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच स्मूथ एक्सपीरियंससाठी फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट देखील आहे आणि या स्मार्टफोनची पीक ब्राइटनेस 1,800 निट्सपर्यंत आहे. एवढंच नाही तर या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 15 वर बेस्ड फनटच OS 15 देखील उपलब्ध आहे. डिव्हाईसमध्ये पावरसाठी स्नॅपड्रॅगन 4 जेनरेशन 2 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आलं आहे.
स्मार्टफोनचा कॅमेरा देखील दमदार आहे. या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सलचा Sony IMX852 प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये खास 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या डिव्हाईसमध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी दिली आहे.
Vivo Y400 5G भारतात कधी लाँच झाला?
4 ऑगस्ट, 2025
Vivo Y400 5G मध्ये किती इंचाचा डिस्प्ले आहे?
6.67 इंच
Vivo Y400 5G चे बॅटरी स्पेसिफिकेशन्स काय आहेत?
90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी