Vivo Y400 Pro 5G vs Nothing Phone 3a: परफॉर्मंस आणि स्पेसिफिकेशन्समध्ये कोणी मारली बाजी? तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन बेस्ट?
टेक कंपनी Vivo ने त्यांचा Y400 Pro 5G स्मार्टफोन अलीकडेच लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मिड रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहे. या स्मार्टफोनला टेक कंपनी Nothing चा Nothing Phone 3a स्मार्टफोन टक्कर देत आहे. याचं कारण म्हणजेच दोन्ही स्मार्टफोनमध्ये अप्रतिम डिझाईन आणि कमाल फीचर्स देण्यात आले आहे. मात्र आता प्रश्न असा आहे की, कोणता स्मार्टफोन बेस्ट आहे? किंमतीपासून फीचर्सपर्यंत कोणत्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला जास्त फायदे मिळणार आहेत? आता या दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमती पाहूया.
8000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा हे तगडे 5G स्मार्टफोन्स, असे आहे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.77 इंचाची AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. Vivo Y400 Pro मध्ये 3D कर्व्ड डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट, 4500 निट्स ब्राइटनेस आणि 300Hz टच सँपलिंग रेट देण्यात आला आहे. ज्यामुळे हा स्मार्टफोन अधिक प्रिमियम बनतो. तर Nothing Phone 3a मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 निट्स ब्राइटनेससह डिस्प्ले देण्यात आला आहे. मात्र या स्मार्टफोनमध्ये कर्व्ड डिझाईन नाही. (फोटो सौजन्य – X)
Vivo Y400 Pro मध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि स्मार्टफोनचा सामान्य वापर देखील अधिक स्मूथ होतो. तर दुसरीकडे Nothing Phone 3a मध्ये देण्यात आलेले Qualcomm Snapdragon 7s Gen 3 चिपसेट CPU आणि GPU परफॉर्मंसच्या बाबतीत अधिक पावरफुल ठरतात. Nanoreview.net च्या बेंचमार्क अहवालात अशीही पुष्टी केली आहे की Nothing चा फोन गेमिंग आणि एकूणच स्मूथनेसमध्ये थोडासा आघाडीवर आहे.
Vivo Y400 Pro मध्ये Sony IMX882 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा सेकेंडरी सेंसर आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो 4K व्हिडीओ रिकॉर्डिंगला देखील सपोर्ट करतो. तर Nothing Phone 3a कॅमेऱ्याच्या बाबतीत अधिक वर्सेटाइल आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी, 8MP अल्ट्रावाइड आणि 50MP टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. यासोबतच 32MP फ्रंट कॅमेरा देखील आहे.
Vivo Y400 Pro मध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर Nothing Phone 3a मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 50W चार्जिंगला सपोर्ट करते. म्हणजेच बॅटरी आणि चार्जिंगच्या बाबतीत Vivo आघाडीवर आहे.
Vivo Y400 Pro 5G स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिअंट 24,999 रुपयांना उपलब्ध आहे, तर त्याचा 256GB व्हेरिअंटची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची प्री-बुकिंग कंपनीच्या वेबसाईटवर सुरू झाली आहे. Nothing Phone 3a ची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे.